सिडनी : दोन वर्षांच्या कालावधीनंतर भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्यास उत्सूक राहू शकतो, असे आॅस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पीने म्हटले आहे.
रवी शास्त्री यांची ११ जुलै रोजी भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. शास्त्री आता कुंबळे यांचे स्थान घेतली. कुंबळे यांनी विराटसोबत मतभेद झाल्यानंतर पदाचा राजीनामा दिला होता.
गिलेस्पी म्हणाला, ‘यावेळी या पदासाठी अर्ज करायचा किंवा नाही, याबाबत मला निर्णय घेता आला नाही. मी याबाबत माझ्या कुटुंबीयांसोबत चर्चा केली. मी या पदासाठी अर्ज करायला हवा, असे मला वाटलेही, पण ते मला निश्चित करता आले नाही. शेवटी मला असे वाटले की, मी यासाठी पूर्ण तयार नाही.’ (वृत्तसंस्था)