विकास अंतिम फेरीत
By admin | Published: September 4, 2015 10:52 PM2015-09-04T22:52:17+5:302015-09-04T22:52:17+5:30
विश्व चॅम्पियनशिपमधील माजी कांस्यपदक विजेत्या विकास कृष्ण (७५ किलो) आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये अंतिम फेरीत स्थान मिळविणारा एकमेव भारतीय बॉक्सर ठरणार
बँकॉक : विश्व चॅम्पियनशिपमधील माजी कांस्यपदक विजेत्या विकास कृष्ण (७५ किलो) आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये अंतिम फेरीत स्थान मिळविणारा एकमेव भारतीय बॉक्सर ठरणार असून अन्य तीन भारतीय बॉक्सर्सला उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागल्यामुळे कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. विकासने इराकच्या बहीद अब्दुलरिधाचा ३-० ने पराभव केला. त्याला अंतिम फेरीत शनिवारी उज्बेकिस्तानच्या बेकतेमीर मलिकुझिएव्हच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
अन्य लढतींमध्ये सतीष कुमार (९१ किलो पेक्षा अधिक), एल. देवेंद्रो सिंग (४९ किलो) आणि गत चॅम्पियन शिव थापा (५६ किलो) यांना उपांत्य फेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे या खेळाडूंना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला असला तरी सतीष, देवेंद्रो आणि शिव यांनी पुढील महिन्यात आयोजित विश्व चॅम्पियनशिपसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. विश्व चॅम्पियनशिप स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर त्यांना रिओ आॅलिम्पिकसाठी स्थान निश्चित करता येईल.(वृत्तसंस्था)