... तर स्लेजिंग करायलाही हरकत नाही - स्मिथ

By admin | Published: February 14, 2017 04:48 PM2017-02-14T16:48:22+5:302017-02-14T16:48:22+5:30

क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ प्रतिस्पर्धी खेळाडूंविरोधात शेरेबाजी (स्लेजिंग) करण्यासाठी कुप्रसिद्ध आहे. सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियन खेळाडू कोणत्याही

... do not even have to sledge - Smith | ... तर स्लेजिंग करायलाही हरकत नाही - स्मिथ

... तर स्लेजिंग करायलाही हरकत नाही - स्मिथ

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई. दि. 14  -  क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ प्रतिस्पर्धी खेळाडूंविरोधात शेरेबाजी (स्लेजिंग) करण्यासाठी कुप्रसिद्ध आहे. सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियन खेळाडू कोणत्याही थराला जाण्यास तयार असतात. आता जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या  भारतीय संघाचे आव्हान परतवून लावण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ आपले ठेवणीतले हत्यार उपसण्याची शक्यता आहे.  भारताविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत स्लेजिंग करण्याविषयीचा निर्णय स्टीव्हन स्मिथने आपल्या संघसहकाऱ्यांवर सोडला आहे. 
चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ भारतात दाखल झाला आहे. येथे आल्यावर आपल्या पहिल्याच पत्रकार परीषदेता स्मिथ म्हणाला, " माझ्या संघातील प्रत्येक खेळाडू हा तसाच खेळेल जशी त्याची इच्छा असेल, तसेच त्यापैकी कुणी खेळाडू प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंविरोधात शेरेबाजी करत असेल आणि त्यामुळे आमच्या संघाला फायदा होत असेल तर शेरेबाजीला माझी मनाई नसेल." भारत आणि ऑस्ट्रेलियामधील अनेक सामने स्लेजिंगमुळे गाजले आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑस्ट्रेलियाच्या शेरेबाजीला वेळोवेळी चोख प्रत्युत्तर काम भारतीय संघाने केले आहे. विशेषत: अॅण्ड्र्यू सायमंड्स आणि हरभजन सिंग यांच्यात झालेल्या मंकीगेट प्रकरणामुळे दोन्ही संघात कटुताही निर्माण झाली होती. 

Web Title: ... do not even have to sledge - Smith

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.