क्रीडा खात्यात असंतोष : मागितले ग्रेडेशन, मिळाली पदोन्नती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 01:25 AM2018-03-11T01:25:07+5:302018-03-11T01:25:07+5:30

राज्य शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागात प्रशिक्षकाची भूमिका बजावणाºयांपैकी २६ राज्य मार्गदर्शकांना नुकतीच तालुका क्रीडाधिकारीपदी बढती देण्यात आली. निवृत्तीला केवळ तीन- चार वर्षे शिल्लक असताना मिळालेले हे ‘गिफ्ट’ आनंददायी ठरण्याऐवजी अनेकांसाठी वेदनादायी ठरले आहे.

Discontinuity in Sports Account: Granted, Granted Upgrades ... | क्रीडा खात्यात असंतोष : मागितले ग्रेडेशन, मिळाली पदोन्नती...

क्रीडा खात्यात असंतोष : मागितले ग्रेडेशन, मिळाली पदोन्नती...

Next

नागपूर - राज्य शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागात प्रशिक्षकाची भूमिका बजावणाºयांपैकी २६ राज्य मार्गदर्शकांना नुकतीच तालुका क्रीडाधिकारीपदी बढती देण्यात आली. निवृत्तीला केवळ तीन- चार वर्षे शिल्लक असताना मिळालेले हे ‘गिफ्ट’ आनंददायी ठरण्याऐवजी अनेकांसाठी वेदनादायी ठरले आहे. आम्ही शासनाकडे ग्रेडेशनची मागणी केली, पण पदोन्नती देऊन गृहजिल्ह्यापासून दूर पाठविले. या पदोन्नतीमागे स्वेच्छानिवृत्ती स्वीकारण्यास भाग तर पाडले जात नाही ना, अशी शंका अनेकांनी उपस्थित केली आहे.
५ मार्च रोजी उपसचिव राजेंद्र पवार यांच्या स्वाक्षरीने निघालेल्या या आदेशात ज्या २६ प्रशिक्षकांना तालुका क्रीडाधिकारीपदी (ब गट राजपत्रित) बढती देण्यात आली तीदेखील ‘निव्वळ तात्पुरत्या’ स्वरुपाची आहे. पदोन्नतीनंतर ५ एप्रिलपर्यंत मिळालेल्या जिल्ह्यात रुजू होण्याचे फर्मान आहे. यासंदर्भात विचारणा केली असता प्रशिक्षक क्रीडा खात्यात २६-२७ वर्षांपासून कार्यरत आहेत. या काळात कुठलेही ग्रेडेशन देण्यात आले नाही. पण न मागता पदोन्नती देण्यात आली ती सेवेच्या अखेरच्या टप्प्यात. एका टोकाहून दुसºया टोकावर नियुक्ती मिळाल्याने नाराजीत आणखी भर पडली. कोचिंग विंगला ग्रेडेशन देण्याचा विचार अधिकाºयांच्या मनात का डोकावला नाही, या शब्दांत नाराजीचा सूर आळवून स्वरांगी सहस्रबुद्धे, जानकी कुलकर्णी, अभय चव्हाण, वर्षा शिंदे, संजीवनी पूर्णपात्रे, उमेश बडवे, पवन मेश्राम, राजाराम दिंडे आणि गजानन पाटील हे स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज देण्याच्या विचारात असल्याची माहिती आहे. या प्रशिक्षकांचे म्हणणे असे, की काही महिन्यांपूर्वी राज्यातील क्रीडातज्ज्ञांच्या बैठकीत प्रशिक्षकांना ग्रेडेशन द्यावे आणि त्यांना इतरत्र न हलविता नियुक्ती असलेल्या ठिकाणी पदकविजेते खेळाडू घडविण्यासाठी कायम ठेवावे, यावर क्रीडामंत्री विनोद तावडे यांनीदेखील सहमती दर्शविली होती. या प्रशिक्षकांबाबत क्रीडा संचालक कार्यालयाचा अनुभव मात्र वेगळाच आहे. यापैकी अनेक जण खेळाडूंवर मेहनत न घेता वर्षानुवर्षे केवळ वेतन घेत असल्याचे एका ज्येष्ठ अधिकाºयाने सांगितले. प्रशिक्षकांना आपल्या घराशेजारीच कौशल्य दाखविण्याची संधी हवी का? त्यांचे कार्यक्षेत्र संपूर्ण राज्य असल्याने पदोन्नती स्वीकारावी. केवळ कागदावर काम केल्याने राज्याचा लौकिक वाढणार नाही. दुर्गम भागातही खेळाडू घडविता येतात. आॅलिम्पिक दर्जाचा खेळाडू कुठेही घडू शकतो, असे या अधिकाºयांचे मत होते. या घटनेमुळे क्रीडा खात्यातील ‘भाईभतीजावाद’ मात्र चव्हाट्यावर आला आहे.

पदोन्नती मिळालेल्या मार्गदर्शकांची
नावे (सर्व खुल्या प्रवर्गासाठी)
जगदीश राजेशिर्के -(ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी), स्वरांगी एस. सहस्रबुद्धे (ता. शहादा, जि. नंदुरबार), बळवंत आर. बाबर (ता. खटाव, जि. सातारा), जानकी कुलकर्णी (ता. कारंजा, जि. वाशिम), अभय एन. चव्हाण (ता. कळमनुरी, जि. हिंगोली), राजेंद्र आर. शिंदे (ता. सडकअर्जुनी, जि. गोंदिया), प्रशांत जी. दोंदल (ता. लाखांदूर, जि. भंडारा), वर्षा डी. शिंदे (ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद), संजीवनी पूर्णपात्रे (ता. कोरपना, जि. चंद्रपूर), पुरुषोत्तम वी. दारव्हणकर (ता. देवळी, जि. वर्धा), उमेश एन. बडवे (ता. चांदूर रेल्वे, जि. अमरावती), कलीमुद्दीन पी. मोहमद्दीन फारुखी (ता. पूर्णा, जि. परभरणी), शरद ए. कचरे (ता. बीड. जि. बीड), पवन एन. मेश्राम (ता. सिरोंचा, जि. गडचिरोली), हितेंद्र हनुुमंत खरात ( ता. सोयगाव, जि. औरंगाबाद), राजाराम बाबूराव दिंडे (ता. अर्धापूर, जि. नांदेड), गजानन मारुती पाटील (ता. फलटण, जि. सातारा), सुभाष महादप्पा नावंदे (ता. अहेरी, जि. गडचिरोली), घनश्याम लक्ष्मीनारायणजी राठी (ता. मेहकर, जि. बुलडाणा), उदय बळवंत पवार (ता. खामगाव, जि. बुलढाणा), विलास मोहनराव चव्हाण (ता. किनवट, जि. नांदेड), सुहासिनी पुरुषोत्तम देशमुख (ता. अंबड, जि. जालना), दिलीप चिंतामणराव ईटनकर (ता. हिंगणा, जि. नागपूर), मीरा रायबान (ता. निलंगा, जि. लातूर), गणेश कालिदास कुलकर्णी (ता. पातूर, जि. अकोला), चंद्रकांत गोपाळराव उप्पलवार (ता. मानोरा, जि. वाशिम).
 

 

Web Title: Discontinuity in Sports Account: Granted, Granted Upgrades ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा