आनंदचा लाग्रेवविरुद्ध विजयाचा निर्धार, नार्वे बुद्धिबळ स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 11:22 PM2018-06-05T23:22:33+5:302018-06-05T23:22:33+5:30

पाच वेळचा विश्व चॅम्पियन विश्वनाथन आनंदची लढत अल्टीबॉक्स नार्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या सातव्या फेरीत फ्रान्सच्या मॅक्सिम वाचियेर लाग्रेवसोबत होईल. त्याची नजर पहिल्या विजयावर आहे.

 Determined to win against Namak, the Norwegian Chess Championship | आनंदचा लाग्रेवविरुद्ध विजयाचा निर्धार, नार्वे बुद्धिबळ स्पर्धा

आनंदचा लाग्रेवविरुद्ध विजयाचा निर्धार, नार्वे बुद्धिबळ स्पर्धा

googlenewsNext

स्टावांगेर : पाच वेळचा विश्व चॅम्पियन विश्वनाथन आनंदची लढत अल्टीबॉक्स नार्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या सातव्या फेरीत फ्रान्सच्या मॅक्सिम वाचियेर लाग्रेवसोबत होईल. त्याची नजर पहिल्या विजयावर आहे.
या स्पधेच्या तीन फेऱ्या बाकी आहेत आणि आनंदने आपल्या सर्वच सामन्यात बरोबरी साधली. त्यामुळे त्याचे गुण २.५ आहेत.
आनंदचे सामने यानंतर अमेरिकेच्या फॅबियानो कारुआना आणि युक्रेनच्या सर्जेई कर्जाकिन यांच्यासोबत होणार आहेत हे दोन्ही खेळाडू शानदार फॉर्ममध्ये आहेत.
विश्व चॅम्पियन व स्थानिक मॅग्नस कार्लसन याला या आधीच्या फेरीत अमेरिकेच्या वेस्ले सो याने पराभूत केले होते. त्यानंतर विजेतेपदासाठीची शर्यत आणखीच चुरशीची झाली आहे. कार्लसनचे ३.५ गुण आहेत. त्याने दोन सामन्यात विजय मिळवला आहे, तर एक पराभूत आणि एक ड्रॉ खेळला आहे. वेसलेने एक विजय मिळवला असून इतर सर्व सामन्यात बरोबरी साधली आहे. (वृत्तसंस्था)

Web Title:  Determined to win against Namak, the Norwegian Chess Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.