बीआयएफमुळे बॉक्सिंगला लाभली संजीवनी, मागील चार वर्षांत खेळाडूंचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 03:37 AM2017-11-21T03:37:11+5:302017-11-21T03:37:25+5:30

गुवाहाटी : ‘वर्षभरापूर्वी बॉक्सिंग फेडरेशन आॅफ इंडियाला (बीएफआय) भारतीय बॉक्सिंगचा कारभार पाहण्याची विश्व संघटनेकडून परवानगी मिळाली.

Boxing is a big loss due to BIF, the big losses of players in the last four years | बीआयएफमुळे बॉक्सिंगला लाभली संजीवनी, मागील चार वर्षांत खेळाडूंचे मोठे नुकसान

बीआयएफमुळे बॉक्सिंगला लाभली संजीवनी, मागील चार वर्षांत खेळाडूंचे मोठे नुकसान

Next

-किशोर बागडे
गुवाहाटी : ‘वर्षभरापूर्वी बॉक्सिंग फेडरेशन आॅफ इंडियाला (बीएफआय) भारतीय बॉक्सिंगचा कारभार पाहण्याची विश्व संघटनेकडून परवानगी मिळाली. या निर्णयावर भारतीय खेळाडूंमध्ये उत्साह संचारला. त्याआधी चार वर्षे आंतरराष्ट्रीय महासंघाकडून मान्यता गोठविण्यात आल्याने खेळाडूंना आंतरराष्टÑीय पातळीवर खेळण्यात बºयाच अडचणी आल्या. स्थाानिक स्पर्धांमध्ये पदक मिळवूनही मेहनतीवर पाणी पडले. भारतीय बॉक्सरसाठी मागचा चार वर्षांचा काळ अतिशय वेदानादायी होता.’ बीएफआयच्या नव्या कार्यकारिणीच्या कार्यशैलीमुळे खेळाडूंना संजीवनी लाभल्याची भावना राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेचा सुवर्णविजेता बॉक्सर मनोज कुमार याने सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
एआयबीए युवा महिला विश्व बॉक्सिंग स्पर्धेला हजेरी लावणारा २०१४चा अर्जुन पुरस्कारप्राप्त मनोज कुमार याने, भारतीय बॉक्सिंग सध्या युवावस्थेत असून आगामी दोन-तीन वर्षांत भारतात बॉक्सरची मोठी फळी निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला. मनोजने २०१०च्या राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेत ६४ किलोगटात (लाईट वेल्टर वेट) सुवर्ण जिंकले होते. सध्या तो गोल्ड कोस्ट राष्टÑकुल स्पर्धेच्या तयारीत पतियाळा येथील राष्टÑीय शिबिरात व्यस्त आहे. युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचे कौशल्य हेरण्यासाठी येथे आल्याचे सांगून मनोज पुढे म्हणाला, ‘‘बीएफआयच्या नव्या कार्यकारिणीने खेळाडूंंच्या सुविधांमध्ये वाढ करून स्पर्धांचा दर्जा उंचावला आहे. विदेशी खेळाडूंसोबत स्पर्धा करता यावी, यासाठी दौरे आखले. अध्यक्ष अजयसिंग हे स्वत: खेळाडूंच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर तोडगा काढतात, हे चित्र खेळाला पुढे नेणारे आहे. यामुळे भारतीय बॉक्सिंगमध्ये खेळाडूंची मोठी फळी निर्र्माण होत असून, युवा खेळाडू भरारी घेतील, असा विश्वास वाटतो.’’
आगामी राष्टÑकुल आणि टोकिया आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याच्या शक्यतेबद्दल विचाराच तो म्हणाला, ‘‘भारतीय युवा बॉक्सरपैकी डिंकोसिंग याने सुरू केलला पदक विजयाचा प्रवास थांबलेला नाही. माझ्यासह अनेक खेळाडू बॉक्सिंमध्ये पदक जिंकण्यास सज्ज आहेत. आमची तयारीदेखील चांगली सुरू आहे. पण, लढतीच्या दिवशी कौशल्य आणि दमखम कसा वापरतो, यावर विजयाची शक्यता विसंंबून असते. सध्या कोच, सहकारी स्टाफ आणि आहारतज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडू घाम गाळत आहेत. खेळाडूंना कुठल्याही अडचणींना तोंड द्यावे लागत नसल्याने आमच्यातही उत्साह आहे. या उत्साहाचा सकारात्मक परिणाम राष्टÑकुल आणि टोकियो आॅलिम्पिकमध्ये पदकांच्या रूपाने होईल, अशी खात्री वाटते.
मनोज गेली दोन वर्षे आई-वडिलांना भेटलेला नाही. विश्व चॅम्पियनशिप खेळून आल्यानंतर काही तासांसाठी तो हरियाणाच्या राजोंद येथे आई-वडिलांंचे आशीर्वाद घेण्यासाठी जाऊन आला. येत्या १० डिसेंंबर रोजी ३१वा वाढदिवस साजरा करणारा मनोज म्हणाला, ‘‘चार-पाच वर्षे मेहनत केल्यानंतर आंतरराष्टÑीय पातळीवर पदकाची आशा निर्माण होते; पण कधीकधी या आशेवर पाणीदेखील पाडले जाते. ज्युरी आणि रेफ्रीच्या चुकीच्या निर्णयाचा बॉक्सरला फटका बसतो. मी स्वत: हा मनस्ताप अनुभवला आहे. लंडन आॅलिम्पिकमध्ये विकास कृष्णनला वाईट अनुभव आला. असे विपरीत घडल्याने खेळाडू खचतो.’’ अन्य खेळांप्रमाणे बॉक्सिंगला भारतात भरभरून प्रसिद्धी मिळत नसल्याची खंत मनोजने व्यक्त केली. बॉक्सरना माध्यमांसह सिनेमा, जाहिराती आणि अन्य माध्यमांमधून प्रसिद्धी देण्याचे त्याने आवाहन केले.
>उद्घाटन सोहळ्याने भारावलो...
सध्या खेळत असलेल्या भारतीय संघातील एकाही मुलीचा खेळ आणि त्यांच्यातील कौशल्य मी पाहिले नसल्याने या खेळाडूंमधून देशासाठी कोण पदक जिंकेल, याविषयी भाष्य करण्यास मनोजने नकार दिला. कालचा उद्घाटन सोहळा मात्र अविस्मरणीय झाल्याचे सांगून तो म्हणाला, ‘‘आॅलिम्पिक आणि कॉमनवेल्थ स्पर्धेच्या सुरुवातीला असे भव्य समारंभ होतात. बॉक्सिंगचे असे उद्घाटन मी तरी पाहिले नव्हते. आयोजनातील नीटनेटकेपणा आणि थाटात पार पडलेले उद्घाटन पाहून मी आनंदी आहे. बॉक्सिंगचे हे नवे युग म्हणावे लागेल.’’
>खेळाडू, कोच यांनी बदल घडवून आणावा : देवांग
टीव्हीवरील प्रसारणामुळे वेळेची मर्यादा आणि प्रेक्षकांची बदललेली रुची लक्षात घेऊन अनेक खेळांचे नियम बदलले आहेत. आमच्या बॉक्सिंगचेही नियम बदलले. अनेक बदल झाले तरी काही खेळाडू आणि कोच जुन्या पद्धतीने सराव करतात. जुन्या गोष्टी विसरण्याची वेळ आली असल्याचे मत भारतीय बॉक्सिंग निवड समिती चेअरमन गोपाल देवांग
यांनी व्यक्त केले.
भारतीय सेनेचे निवृत्त कॅप्टन आणि अर्जुुन पुरस्काराचे मानकरी देवांग म्हणाले, ‘‘भारतीय खेळाडूंना विदेशी कोचच्या मार्गदर्शनाखाली सराव करताना काही अडचणी येतात हे खरे आहे; पण त्या लवकर दूर करणे खेळाडूंच्या हातात आहे. कोचचे म्हणणे ध्यानात घेऊन आहार आणि सराव यांंची सांगड घालायला हवी. कोचनेदेखील
खेळाडूंना नवनवीन गोष्टींची जाणीव करून देणे गरजेचे आहे.’’
येथे सुरू असलेल्या युवा महिला बॉक्सिंगमध्ये भारताला दोन सुवर्णांससह ५ ते ६ पदके मिळू शकतील, असा विश्वास त्यांंनी व्यक्त केला. अनपेक्षित निकालासह पदकविजेत्या भारतीय खेळाडू पुढील राष्टÑकुल आणि टोकियो ओॅलिम्पिकच्या तयारीसाठी निवड चाचणीत स्पर्धा करू शकतील, असे देवांग यांनी याविषयी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

Web Title: Boxing is a big loss due to BIF, the big losses of players in the last four years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.