बीमर टाकणा-या लकमलला दंड

By admin | Published: March 2, 2015 12:56 AM2015-03-02T00:56:42+5:302015-03-02T09:51:44+5:30

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज सुरंगा लकमलने इंग्लंडचा फलंदाज जोस बटलरला सलग दोन बीमर टाकल्यामुळे त्याच्यावर दंड ठोठावण्यात आला.

Beamer throwing or lacquer penalty | बीमर टाकणा-या लकमलला दंड

बीमर टाकणा-या लकमलला दंड

Next

वेलिंग्टन : श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज सुरंगा लकमलने इंग्लंडचा फलंदाज जोस बटलरला सलग दोन बीमर टाकल्यामुळे त्याच्यावर दंड ठोठावण्यात आला.
आयसीसीने स्पष्ट केले की, ‘विश्वकप स्पर्धेत रविवारी ‘अ’ गटात इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या लढतीत श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लकमलने ५० व्या षटकांदरम्यान बटलरला सलग दोन बीमर चेंडू टाकले. ज्यावेळी त्याने पहिला बीमर चेंडू टाकला त्यावेळी मैदानावरील पंच रॉड टकर यांनी त्याला ताकीद दिली होती. लकमलने दुसऱ्यांदा हीच चूक केली. त्यानंतर पंचांनी त्याला गोलंदाजी करण्यापासून रोखले आणि सामनाधिकारी डेव्हिड बून यांच्याकडे त्याची तक्रार केली.’
बून म्हणाले, ‘दोषी आढळल्यामुळे लकमलवर दंड ठोठावण्यात आला. दंड म्हणून त्याला मिळाणाऱ्या सामना शुल्कातील ३० टक्के रकमेची कपात करण्यात येणार आहे. बीमर टाकणे धोकादायक आहे. ही चुकीची गोलंदाजी होती.’
लकमल या लढतीत महागडा गोलंदाज ठरला. त्याने ७.४ षटकांत ७१ धावा बहाल केल्या. त्याने एक बळी घेतला. श्रीलंकेने या लढतीत ९ गडी राखून विजय मिळविला. (वृत्तसंस्था)

Web Title: Beamer throwing or lacquer penalty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.