Asian Para games 2018 : भारताच्या सुयश जाधवची सुवर्ण कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 06:03 PM2018-10-08T18:03:33+5:302018-10-08T18:04:35+5:30

Asian Para games 2018: भारताच्या सुयश जाधवने आपली वैयक्तिक कामगिरी उंचावताना आशियाई पॅरा स्पर्धेत भारताला दुसरे सुवर्णपदक जिंकून दिले.

Asian Para games 2018: India's Suyash Jadhav won gold in asian para games 2018 | Asian Para games 2018 : भारताच्या सुयश जाधवची सुवर्ण कामगिरी

Asian Para games 2018 : भारताच्या सुयश जाधवची सुवर्ण कामगिरी

Next

जकार्ता, आशियाई पॅरा स्पर्धा 2018 : भारताच्या सुयश जाधवने आपली वैयक्तिक कामगिरी उंचावताना आशियाई पॅरा स्पर्धेत भारताला दुसरे सुवर्णपदक जिंकून दिले. जलतरणपटू सुयशने पुरुषांच्या 50 मीटर बटरफ्लाय प्रकारात 32.71 सेकंदाची वेळ नोंदवून सुवर्ण कामगिरी केली. या स्पर्धेतील त्याचे हे तिसरे पदक आहे. यापूर्वी त्याने 200 मीटर वैयक्तिक मीडले आणि 50 मीटर फ्रिस्टाईल गटात कांस्यपदकांची कमाई केली आहे.



सोमवारी झालेल्या 50 मीटर बटरफ्लाय S7 (6-7) गटात सुयशने चीन व थायलंडच्या जलतरणपटूंना पिछाडीवर टाकले. चीनच्या यांग होंगला ( 33.54 से.) आणि थायलंडच्या पयुंगसकुल बूनयारित ( 38.09 से.) यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक जिंकता आले.  भारताचे हे स्पर्धेतील आत्तापर्यंतचे 14 वे पदक ठरले. भारताने 2 सुवर्ण, 5 रौप्य व 7 कांस्यपदक जिंकले आहे. 

Web Title: Asian Para games 2018: India's Suyash Jadhav won gold in asian para games 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.