उत्कंठापूर्ण स्पर्धेत आनंदची सरशी

By admin | Published: December 16, 2014 12:57 AM2014-12-16T00:57:26+5:302014-12-16T00:57:26+5:30

६वी लंडन बुद्धिबळ क्लासिक स्पर्धा भारताच्या विश्वनाथन आनंदने जिंकली. स्पर्धेच्या शेवटच्या लढतीत आनंदने इंग्लिश ग्रँडमास्टर मायकल अ‍ॅडम्सला काळ्या मोह-यानी पराभूत करून विजेतेपदावर आपले नाव कोरले.

Anand ki Sarashey in the adventurous competition | उत्कंठापूर्ण स्पर्धेत आनंदची सरशी

उत्कंठापूर्ण स्पर्धेत आनंदची सरशी

Next

केदार लेले, लंडन
६वी लंडन बुद्धिबळ क्लासिक स्पर्धा भारताच्या विश्वनाथन आनंदने जिंकली. स्पर्धेच्या शेवटच्या लढतीत आनंदने इंग्लिश ग्रँडमास्टर मायकल अ‍ॅडम्सला काळ्या मोह-यानी पराभूत करून विजेतेपदावर आपले नाव कोरले. अनिष गिरी विरुद्ध क्रॅमनिक आणि कॅरुआना विरुद्ध नाकामुरा यांच्यातील डाव बरोबरीत सुटले.
अ‍ॅडम्स आणि आनंद यांच्यातील रॉय लोपेझ पद्धतीतील बर्लिन बचाव पद्धतीने झाला. आनंदकडे काळी मोहरी होती. मायकल अ‍ॅडम्सने १६ व्या आणि १७ व्या चालींवर कल्पकतेने आनंदवर दबाव निर्माण करण्यात यश मिळवले! पण २४व्या चालीवर आनंदने डावात बरोबरी साधत अ‍ॅडम्सला चांगलेच पेचात टाकले.
२८ व्या चालीवर अ‍ॅडम्सने केलेली प्याद्याची चाल चुकली, ज्याचा फायदा आनंदने उठविला.

Web Title: Anand ki Sarashey in the adventurous competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.