पडद्यावरील 'छोट्या बबिता'चा १९ व्या वर्षी मृत्यू; अभिनेत्री सुहानीच्या निधनाने कुस्तीपटू भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 07:08 PM2024-02-17T19:08:50+5:302024-02-17T19:23:06+5:30

'दंगल' फेम अभिनेत्री सुहानी भटनागरचे निधन झाले आहे.

Actress Suhani Bhatnagar, who played the role of Babita Phogat in Aamir Khan's Dangal, has died at the age of 19 | पडद्यावरील 'छोट्या बबिता'चा १९ व्या वर्षी मृत्यू; अभिनेत्री सुहानीच्या निधनाने कुस्तीपटू भावूक

पडद्यावरील 'छोट्या बबिता'चा १९ व्या वर्षी मृत्यू; अभिनेत्री सुहानीच्या निधनाने कुस्तीपटू भावूक

Actress Suhani Bhatnagar Died: 'दंगल' फेम अभिनेत्री सुहानी भटनागरचे निधन झाले आहे. १९व्या वर्षी सुहानीने जगाचा निरोप घेतला. तिच्या निधनाने चाहत्यांना धक्का बसला असून बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. सुहानीने 'दंगल' चित्रपटात आमिर खानची मुलगी असलेल्या छोट्या बबिताची भूमिका साकारली होती. पडद्यावरील बबिताच्या मृत्यूवर व्यक्त होताना कुस्तीपटू बबिता कुमारी फोगाटने भावनिक पोस्ट केली आहे. 

बबिता फोगाटने सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले की, दंगल या चित्रपटात माझ्या लहानपणीची भूमिका साकारणारी सुहानी भटनागर हिचे इतक्या लहान वयात निधन झाले हे खूप दुःखदायक आहे. यावर माझा विश्वास बसत नाही, या बातमीने धक्का बसला आहे. ईश्वर तिच्या आत्म्याला शांती देवो आणि या दुःखाच्या प्रसंगी संपूर्ण कुटुंबाला आणि चाहत्यांना हे नुकसान सहन करण्याची हिंमत देवो. ओम शांती.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून सुहानीवर फरीदाबाद येथील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. उपचार सुरू असतानाच तिला औषधांमुळे रिएक्शन होऊन शरीरात संपूर्ण पाणी झाल्याची माहिती 'दैनिक भास्कर' या वृत्तसंस्थेने दिली आहे. उपचारादरम्यानच शुक्रवारी (१६ फेब्रुवारी) रात्री तिचे निधन झाले. 'दंगल' चित्रपटातून सुहानीने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. तिच्या अभिनयाने सगळ्यांची मनं जिंकली होती. पण, 'दंगल' चित्रपटानंतर ती सिनेसृष्टीपासून दूर होती.  

Web Title: Actress Suhani Bhatnagar, who played the role of Babita Phogat in Aamir Khan's Dangal, has died at the age of 19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.