महापालिकेच्या चारही प्रभाग अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 02:06 AM2018-08-25T02:06:07+5:302018-08-25T02:10:17+5:30

पनवेल महानगरपालिकेतील चारही प्रभागातील प्रभाग अधिकाऱ्यांच्या रातोरात तडकाफडकी अंतर्गत बदल्या करण्यात आलेल्या आहेत.

Tackling of the four ward officers of the municipal corporation | महापालिकेच्या चारही प्रभाग अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

महापालिकेच्या चारही प्रभाग अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Next

पनवेल : पनवेल महानगरपालिकेतील चारही प्रभागातील प्रभाग अधिकाऱ्यांच्या रातोरात तडकाफडकी अंतर्गत बदल्या करण्यात आलेल्या आहेत. या अधिकाऱ्यांसह चार प्रभागातील २६ कर्मचाऱ्यांच्या देखील बदल्या करण्यात आल्याने पालिका कर्मचाऱ्यांमध्ये एकच तारांबळ उडाली आहे.
महापालिकेच्या प्रभाग अधिकाºयांच्या बदल्या करण्याचा निर्णय गुरु वारीच घेण्यात आला. या बदल्यांची माहिती या प्रभाग अधिकाºयांना देखील नसल्याने त्यांच्यासाठी हा आश्चर्याचा धक्का होता. पालिकेत समाविष्ट ग्रामपंचायतीच्या २६ कर्मचाºयांचा देखील यामध्ये समावेश आहे. पालिकेच्या स्थापनेपासून ग्रामपंचायतीचे काही कर्मचारी एकाच जागेवर कार्यरत होते. या बदलीचे कारण जरी प्रशासकीय बदली सांगितले जात असले तरी या मागचे कारण काही कर्मचारी व अधिकाºयांच्या तक्रारी असल्याचे बोलले जात आहे. अतिक्रमण कारवाईदरम्यान अनेक अधिकाºयांचे नगरसेवकासोबत खटके उडाले आहेत. तसेच काही पालिका कर्मचारी देखील अतिक्र मण पथकामध्ये कार्यरत असताना कारवाईदरम्यान दुजाभाव करीत होते. आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे देखील यासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. पालिकेतील २३ ग्रामपंचायतींच्या २६ कर्मचाºयांचा देखील यामध्ये समावेश आहे.
सह आयुक्त चंद्रशेखर खामकर यांनी यासंदर्भात आदेश काढून नवीन नियुक्तीच्या ठिकाणी कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. या बदल्यांमुळे सर्व कर्मचाºयांमध्ये खळबळ उडाली आहे.

बदली झालेले प्रभाग अधिकारी - बदली झालेले प्रभाग
श्रीराम हजारे ( प्रभाग अधिकारी अ ) (प्रभाग ड)
भगवान पाटील (प्रभाग अधिकारी ब) (प्रभाग अ)
प्रकाश गायकवाड (प्रभाग अधिकारी क) (प्रभाग ब)
हरिश्चंद्र कडू (प्रभाग अधिकारी ड ) (प्रभाग क)

गुरुवारी झालेल्या बैठकीमध्ये खातेअंतर्गत बदल्यांचा निर्णय घेण्यात आला असून या नियमित बदल्या आहेत.
- गणेश देशमुख,
आयुक्त,
पनवेल महापालिका

Web Title: Tackling of the four ward officers of the municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.