गाळमुक्त धरण योजनेला पनवेलमधून अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 07:16 AM2018-05-28T07:16:24+5:302018-05-28T07:16:24+5:30

शासनाच्या गाळमुक्त धरण या योजनेला पनवेल परिसरातून अत्यल्प प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसून येत आहे. या योजनेसाठी केवळ २७ शेतकऱ्यांचे अर्ज आले असल्याने या योजनेबाबत अधिकाधिक जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.

 Short-response from the Panvel-free Removal Scheme from Panvel | गाळमुक्त धरण योजनेला पनवेलमधून अल्प प्रतिसाद

गाळमुक्त धरण योजनेला पनवेलमधून अल्प प्रतिसाद

Next

- मयूर तांबडे
पनवेल - शासनाच्या गाळमुक्त धरण या योजनेला पनवेल परिसरातून अत्यल्प प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसून येत आहे. या योजनेसाठी केवळ २७ शेतकऱ्यांचे अर्ज आले असल्याने या योजनेबाबत अधिकाधिक जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.
धरणांमधून गाळ काढल्याने धरणांची पाणी साठवण क्षमता वाढणार असून त्या भागातील दुष्काळी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यास हातभार लागणार आहे. त्याचबरोबर हा धरणातील गाळ शेतकºयांच्या शेतात टाकल्याने त्यांच्या शेतातील जमीन अधिक सुपीक होऊन शेतकºयांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. ही शेतकºयांच्या हिताची बाब असली तरीदेखील पनवेलमधून या योजनेला केवळ २६ अर्जदारांनी प्रतिसाद दिलेला आहे. तालुक्यातील मोहो, सांगुर्ली, चीरवत, तुरमाळे, ओवे, भाताण, कल्हे, हरीग्राम, मोहोपे, टेमघर, वाजे, चेरवली, मालडूंगे, कोप्रोली, दुन्द्रे, गाढे, नेरे येथील २७ शेतकºयांनी धरणातील गाळ काढण्यास सुरुवातही केली आहे.
तालुक्यातील पनवेल महापालिकेच्या मालकीचे असलेले देहरंग धरण २00५मध्ये आलेल्या पुरामुळे गाळाने भरले. त्यामुळे धरणाची पाणी साठवण्याची क्षमता कमी झाली. या धरणात मोठ्या प्रमाणात गाळ असून, तो काढण्यासाठी प्रशासनाकडून याअगोदर प्रयत्नही करण्यात आले.
गाढेश्वर धरण क्षेत्रात महानगरपालिकेच्या मालकीची २७७ एकर जमीन असून त्यातील १२५ एकर क्षेत्रावर देहरंग धरण वसलेले आहे. निम्म्याहून अधिक जागेत धरणाचे पाणी साचत नाही. वर्षानुवर्षे साचलेला धरणातील गाळ निघत नसल्यामुळे जास्तीचा पाणीसाठा होत नाही. परिणामी, दरवर्षी महापालिकेला एमजेपी, एमआयडीसी आणि सिडकोच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. धरणामध्ये साचलेला गाळ उपसा करून शेतात पसरविल्यास धरणांची मूळ साठवण क्षमता पूर्ववत होण्याबरोबरच कृषी उत्पन्नात वाढदेखील होणार आहे. जलसाठ्यांतदेखील वाढ होणार आहे. या योजनेमध्ये स्थानिक शेतकºयांनी त्यांच्या शेतामध्ये ते स्वखर्चाने गाळ वाहून नेण्यास तयारी असणे गरजेचे आहे.
मोहो येथील हसुराम धर्मा म्हात्रे, प्रमोद म्हात्रे, कोंडले येथील मनोज महादेव आंग्रे, सांगुर्ली ग्रामपंचायत यांनी मोरबे, सांगुर्ली, चीरवत, तुरमाले, मोहो येथील तलावातील गाळ काढण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.
मालडूंगे येथील लीला उघडा, सखाराम भुर्बडा, कोप्रोली येथील रमेश पाटील, दुन्द्रे येथील संजय पाटील, गाढे येथील महादू वारगडा, वाजे येथील रुपेश भोईर, बबन पाटील, गजानन पाटील, नेरे येथील संदीप ठाकूर, कल्हे येथील बिपीन मुनोथ, हरिग्राम येथील राधीबाई डांगरकर, रतन पाटील, मोहोपे येथील दिलीप पाटील, गोमा भोईर, बाळाराम भोईर, दत्तात्रेय पवार, अंकुश मुंढे, टेमघर येथील वामन म्हात्रे, चेरवली येथील वसंत पाटील यांना महापालिकेच्या मालकीच्या देहरंग धरणातून गाळ काढण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. भाताण ग्रामपंचायतने भाताण येथील तलावातील गाळ काढण्यासाठी अर्ज केला आहे. ओवे येथील खतीबाजी अब्दुल रशीद खान यांनी ओवे तलावाचा गाळ काढण्यासाठी अर्ज केला आहे. देहरंग धरणातून लाखो ब्रास गाळ निघणे अपेक्षित आहे. तरच धरणात पाण्याचा साठा वाढू शकतो. मात्र आत्तापर्यंत समाधानकारक गाळ काढण्यात आला नसल्याची माहिती तहसील विभागाकडून देण्यात आलेली आहे. त्यामुळे शासनाच्या गाळमुक्त धरण योजनेला पनवेलमधून जास्तीचा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

Web Title:  Short-response from the Panvel-free Removal Scheme from Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.