कळंबोली वसाहतीत उभारले सात ई-टॉयलेट, एक महिन्यात वापरास खुले होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 02:23 AM2017-10-05T02:23:09+5:302017-10-05T02:23:35+5:30

महापालिकेच्या स्वच्छ भारत अभियानानंतर सिडको प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकले आहे. कळंबोली वसाहतीत ई- टॉयलेट उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

Seven e-Toilets set up at Kalamboli colony, will be open for one month | कळंबोली वसाहतीत उभारले सात ई-टॉयलेट, एक महिन्यात वापरास खुले होणार

कळंबोली वसाहतीत उभारले सात ई-टॉयलेट, एक महिन्यात वापरास खुले होणार

Next

अरुणकुमार मेहत्रे 
कळंबोली : महापालिकेच्या स्वच्छ भारत अभियानानंतर सिडको प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकले आहे. कळंबोली वसाहतीत ई- टॉयलेट उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पन्नास लाखांपेक्षा जास्त खर्च करून एकूण सात टॉयलेट उभारून एका महिन्याच्या आत ते वापरण्यास खुले करण्यात येणार आहे. त्यामुळे रहिवासी, पादचाºयांची होणारी गैरसोय दूर होणार आहे.
कळंबोलीत सार्वजनिक स्वच्छतागृह आणि शौचालयाची बोंबाबोंब आहे. वारंवार पाठपुरावा करूनही स्वच्छतागृह आणि शौचालयाची व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. परंतु राज्य व केंद्र शासनाने हाती घेतलेले स्वच्छता अभियान पनवेल महानगरपालिकेने बºयापैकी यशस्वी केले आहे. त्याचबरोबर आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे यांनी पुढाकार घेवून महापालिका क्षेत्र हागणदारीमुक्त केले आहे. त्यानुसार सिडकोने या कामासाठी आपले योगदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अधीक्षक अभियंता एस.जी. रोकडे यांनी कळंबोलीत ई-टॉयलेट उभारण्याकरिता पुढाकार घेतला. वरिष्ठ कार्यालयाकडे त्यांनी पाठपुरावा करून प्रस्ताव मंजूर करून घेतला.
नवी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर हा उपक्र म हाती घेण्यात आलेला आहे. या वसाहतीत पादचारी, फेरीवाले, रिक्षावाले त्याचबरोबर दिवसभर रस्त्यावर काम करणाºयांची संख्या कमी नाही. त्यांना शौचालयाची व्यवस्था नसल्याने मोठी कुचंबणा होत होती. ई-टॉयलेट सुरू झाल्यानंतर ही गैरसोय दूर होणार आहे.

स्वयंचलित शौचालय
पर्यावरणाच्या दृष्टिकोनात उपकारक असलेले हे टॉयलेट स्वयंचलित आहेत. त्यामध्ये दोन रुपयांचे कॉईन टाकले की ते ओपन होईल. स्टीलद्वारे संपूर्ण शौचालये तयार करण्यात आले आहे. पाण्याचा अपव्यय टळणार आहेच त्याचबरोबर स्वच्छता राहील. संगणकाद्वारे त्यावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. एम.एन. काळभोर ही कंपनी ई- टॉयलेटचे काम करीत आहे.

नागरिक, प्रवाशांची गैरसोय लक्षात घेवून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे ई-टॉयलेट ही संकल्पना राबविण्यात येत आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला तरी इतर ठिकाणी ही सुविधा सुरू करण्याचा आमचा मानस आहे. यामुळे स्वच्छता तर राहीलच त्याचबरोबर पाण्याची नासाडी होणार नाही.
- बी.व्ही. गायकवाड,
साहाय्यक कार्यकारी अभियंता, सिडको,
कळंबोली

Web Title: Seven e-Toilets set up at Kalamboli colony, will be open for one month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.