झोडपले!! पावसामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 04:18 AM2018-07-08T04:18:29+5:302018-07-08T04:18:41+5:30

मुसळधार पावसामुळे नवी मुंबईसह पनवेलमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गाढी नदीला पूर आल्यामुळे एका गावाचा संपर्क तुटला आहे. सायन - पनवेल महामार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या दिशेला दिवसभर चक्काजामची स्थिती निर्माण झाली होती.

 Screwed !! The traffic system collapsed due to the rain | झोडपले!! पावसामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली

झोडपले!! पावसामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली

Next

नवी मुंबई  - मुसळधार पावसामुळे नवी मुंबईसह पनवेलमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गाढी नदीला पूर आल्यामुळे एका गावाचा संपर्क तुटला आहे. सायन - पनवेल महामार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या दिशेला दिवसभर चक्काजामची स्थिती निर्माण झाली होती. वाशी ते नेरूळ दरम्यान सात किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी एक तासापेक्षा जास्त वेळ जात असल्यामुळे वाहतूकदारांसह प्रवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला होता.
कळंबोलीमध्ये सर्व रोड पाण्याखाली गेले होते. टोल नाक्यावर दोन ते तीन किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. अर्धा ते एक तास वाहतूककोंडीमध्ये अडकावे लागत असल्यामुळे प्रवाशांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली. उरण फाटा, सीबीडी, नेरूळ, तुर्भे येथेही प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. तुर्भे पुलाखाली असलेल्या खड्ड्यांमुळे वाशी टोल नाक्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सात किलोमीटर अंतर कापण्यासाठी एक तास वेळ लागत होता. शहरातील बहुतांश सर्व भुयारी मार्गांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.
पनवेल तालुक्यालाही पावसाने झोडपले. गाढी, लेंडी, कासाडी नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. गाढी नदीची पातळी वाढल्यामुळे उमरोली गावाचा संपर्क तुटला आहे. कळंबोलीमधील फूड लँड कंपनी ते पडघे दरम्यानच्या रोडचीही प्रचंड दुरवस्था झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील तीन गावांमध्येही पाणी शिरल्याची घटना घडली असून, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते.

ऐरोली, दिघ्यात स्थिती बिकट
पावसामुळे दिघा येथील मुकुंद कंपनीकडून बिंदुमाधव नगरकडे येणारा नाला, घणसोली सिम्प्लेक्स, घरोंदा व इतर ठिकाणच्या मोठ्या नाल्यांमधील पाण्याची पातळी वाढली होती. रबाळे एमआयडीसीतील साईबाबा नगर, नोसील नाका, घणसोलीमधील अर्जुनवाडी, बाळाराम वाडी, महादेव वाडी परिसरामध्ये पाणी साचल्याच्या घटना घडल्या होत्या.

चार ठिकाणी वृक्ष कोसळले
पावसामुळे वृक्ष कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. तुर्भे स्मशानभूमी, ऐरोली सेक्टर ९, बेलापूर सेक्टर ८ व ऐरोली सेक्टर १९ मध्ये वृक्ष कोसळण्याची नोंद पालिकेच्या आपत्कालीन विभागामध्ये झाली आहे.

तळोजा रोडवरील स्थिती बिकट
कळंबोली ते तळोजा दरम्यान फूडलँड कंपनीपासून पडघे दरम्यान रोडची स्थिती बिकट झाली आहे. या रोडवर मोठे खड्डे पडले आहेत. पाणी साचल्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात होत आहेत. शुक्रवार व शनिवारी अनेक अपघात याठिकाणी झाले आहेत. कळंबोली विकास समितीचे सदस्य प्रशांत रणवरे यांनी याविषयी प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. प्रशासन प्रत्येक वर्षी डांबरीकरण करते व काम निकृष्ट असल्यामुळे पावसात खड्डे पडतात. यामुळे या रोडचे काँक्रीटीकरण करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

उरणमध्ये शाळेचे छप्पर पडले
संततधार पडणाºया मुसळधार पावसाने उरण तालुक्याला झोडपून काढले आहे. अनेक भागात पावसाचे पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे, तर पडणाºया पावसात केगाव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या प्राथमिक शाळेच्या इमारतीचे कौलारू छत कोसळल्याची घटना घडली आहे. कोणत्याही प्रकारे जीवितहानी झाली नसली तरी विद्यार्थी, पालक वर्गात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दोन गावांचा
संपर्क तुटला
मुसळधार पावसामुळे गाढी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. उमरोली गावाचा संपर्क तुटला आहे. नदीवर पूल छोटा असून धोकादायक झाला आहे. पावसामुळे येथील नागरिकांना नोकरी, व्यवसायासाठी घराबाहेर पडता आले नाही. मुलांना शाळेमध्येही पाठविता आले नाही. यापूर्वी २०१६ मध्ये उमरोली पुलावरून पडल्याने १६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. गतवर्षी २२ वर्षांचा युवक अजयसिंग नदीत पडला होता. सुदैवाने त्याचा जीव वाचविण्यात यश आले आहे.
मुंबई-गोवा रोडवरील डोलघर गावाचा संपर्कही तुटला आहे. पातळगंगा नदीची पातळी वाढल्यामुळे परिसरामध्ये पाणी शिरले आहे.

टोल व्यवस्थापनास जाब विचारला
सायन-पनवेल महामार्गावर खारघर टोल नाक्यावर टोल व्यवस्थापनाने काहीही उपाययोजना केल्या नव्हत्या. यामुळे संतापलेल्या नागरिकांनी वाहतूक सुरळीत होईपर्यंत टोल न घेण्याची मागणी केली. परंतु टोल व्यवस्थापन आडमुठे धोरण घेत असल्यामुळे सीबीडीमधील योगेश चव्हाण यांनीही टोल व्यवस्थापनाला धारेवरून धरून नागरिकांना वेठीस धरू नका, अशी मागणी केली.

दोन गावांत
पाणी शिरले
पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील किरवली व रोहिंजन गावात पाणी शिरण्याची घटना घडली आहे. याशिवाय कळंबोली, कामोठे, खारघर टोल नाका, कोपरा उड्डाणपूल परिसरामध्येही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर बोर्ले येथील भुयारी मार्गही पाण्याखाली गेला होता.

मोरबेची पातळी वाढली
मुसळधार पावसामुळे मोरबे धरणाची पातळी वाढली आहे. धरणामध्ये ८० मीटरपर्यंत पाणी पातळी वाढली असून धरण पूर्ण भरण्यास फक्त ८ मीटर बाकी आहे. पाऊस असाच राहिल्यास यावर्षीही धरण पूर्ण भरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

रानसई धरण भरले
उरण तालुक्यातील जनतेला पाणीपुरवठा करणारे रानसई धरण भरून वाहू लागल्याने ओसंडून वाहणाºया धरणातील पाण्याचा आनंद लुटण्यासाठी तरु णाई, पर्यटकांची पावले रानसई धरणाकडे वळली असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

Web Title:  Screwed !! The traffic system collapsed due to the rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.