विधिमंडळ समितीकडून प्रदूषणाचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 04:57 AM2018-08-29T04:57:49+5:302018-08-29T04:58:22+5:30

तळोजासह नवी मुंबईला भेट : सीईटीपीच्या कामकाजाविषयीही व्यक्त केली नाराजी

 Review of pollution from the Legislature Committee | विधिमंडळ समितीकडून प्रदूषणाचा आढावा

विधिमंडळ समितीकडून प्रदूषणाचा आढावा

Next

तळोजा : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमाच्या व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमण्यात आलेल्या सार्वजनिक उपक्र म समितीने तळोजासह, ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीचा पाहणी दौरा केला. प्रदूषण वाहनतळासह औद्योगिक वसाहतीमधील सुविधांचीही पाहणी केली. तळोजा सीईटीपीच्या कामकाजाविषयीही नाराजी व्यक्त करण्यात आली.

भाजपा आमदार अनिल बोंडे व राष्ट्रवादीचे रामराव वडकुते यांनी सोमवारी पाताळगंगा एमआयडीसीची पाहणी केल्यानंतर मंगळवारी ठाणे-बेलापूर व तळोजा औद्योगिक वसाहतींना भेट दिली. तळोजातील दीपक फर्टिलायझर या कारखान्याला भेट देत या ठिकाणाची पाहणी केली. तळोजातील ट्रक टर्मिनललाही भेट दिली. वाहनतळाची झालेली दुरवस्था पाहून त्याची स्थिती सुधारण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. तळोजा औद्योगिक वसाहतीच्या सांडपाणी प्रक्रि या केंद्राची प्रामुख्याने भेट समितीने घेतली व येथील संचालक मंडळाचे म्हणणे ऐकून घेत या प्रकल्पाबाबत नाराजी व्यक्त केली. सांडपाणी प्रक्रि या केंद्रातील मरगळ दूर करण्यासाठी हा प्रकल्प एमआयडीसीने चालवणे गरजेचे असल्याचे मत या वेळी आमदारांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

सीईटीपीत कोणत्या पद्धतीत पाण्याचे शुद्धीकरण करण्यात येते, या बाबत संचालक सतीश शेट्टी यांनी माहिती दिली; पण हरित लवादाच्या कचाट्यात अडकलेल्या सीईटीपीला दहा कोटी दंड भरावा, असे आदेश देण्यात आल्याचे समितीच्या लक्षात आल्यानंतर या सर्व प्रकारची माहिती संचालकांकडून घेऊन वस्तुस्थिती समजून घेतली.
तळोजा औद्योगिक परिसरात लहान-मोठे असे एकूण ९७४ कारखाने आहेत, या कारखान्यांतून निघणाऱ्या घातक पाण्यावर प्रक्रि या करण्यासाठी सीईटीपी उभी झाली. मात्र, हरितलवादाच्या म्हणण्यानुसार २०१३ पासून या सीईटीपीने नियम धाब्यावर बसवून जलशुद्धीकरणाच्या नावावर गांभीर्याने हा प्रकल्प चालवला नसल्याचे स्पष्ट केले आहे, त्यामुळे हा प्रकल्प एमआयडीसीकडे हस्तांतर करण्यासाठी ही कमिटी प्रस्ताव सादर करणार आहे.
सीईटीपीच्या सध्याच्या कामकाजावर पाहणीदौºयातील समितीने शंकाही उपस्थित केली.

शासनाकडे अहवाल देणार
सार्वजनिक उपक्र म समितीच्या वतीने ठिकठिकाणी पाहणी दौरे सुरू आहेत. अभ्यास समिती त्यांचा अहवाल शासनाला सादर करणार आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीत हा दौरा पार पडला. यामध्ये तळोजाच्या ट्रक टर्मिनलची दुरवस्था व तळोजा सीईटीपीच्या सुधारणेबाबत विचार करण्यात येणार आहे. तसा अहवाल समिती शासन दरबारी सादर करेल. सीईटीपी एमआयडीसीकडे हस्तांतर करण्याच्या दृष्टीने देखील उपाययोजना केल्या जाणार आहेत.

प्रदूषणविरहित दिवस
तळोजा औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. कारखान्यांच्या चिमणींमधून दिवस-रात्र धुराचे लोट निघत असतात. रसायनमिश्रित पाणी कासाडी नदीमध्ये सोडण्यात येत असते; परंतु आमदारांची समिती येणार असल्यामुळे बहुतांश कारखान्यांमधून हवेत जाणारे धुराचे लोट व रसायनमिश्रित पाणी बाहेर येत नव्हते. एक दिवस प्रदूषणविरहित गेल्याची प्रतिक्रिया जाणकारांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमाच्या व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमण्यात आलेली सार्वजनिक उपक्र म समिती यांच्या माध्यमातून हा दौरा घेण्यात आला. पाताळगंगा, तळोजा व महापे या ठिकाणी हा दौरा सुरू आहे. परिसरातील विविध जीवनावश्यक बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही समिती कार्यरत असून तळोजातील ट्रक टर्मिनल व प्रदूषणाच्या बाबत गंभीर दखल घेण्याबाबतचा अहवाल लवकरच समितीच्या माध्यमातून शासन दरबारी मांडला जाईल .
- डॉ. अनिल बोंडे,
आमदार भाजपा, समिती प्रमुख सार्वजनिक उपक्र म समिती

Web Title:  Review of pollution from the Legislature Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.