पनवेल मनपाचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 02:35 PM2017-11-30T14:35:20+5:302017-11-30T18:27:49+5:30

पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. निनावी पत्राद्वारे त्यांनी ही धमकी देण्यात आली आहे.

Panvel Municipal Commissioner Dr. Sudhakar Shinde threatens | पनवेल मनपाचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी 

पनवेल मनपाचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी 

Next

- वैभव गायकर

पनवेल : पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना जीवे ठार मारण्याची धमकी निनावी पत्राद्वारे देण्यात आली आहे . आयुक्त शिंदे हे शासनाच्या शिष्टमंडळासाठी चीनला गेले असताना टपाल द्वारे हे गोपनीय पत्र पनवेल महानगर पालिकेला पाठविण्यात आले आहे . यासंदर्भात आयुक्त शिंदे यांनी गुरुवारी पालिका मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली आहे . 
    तुम्ही मग्रुरीने पालिकेचा कारभार हाकत आहात . हे कुठेतरी थांबायला हवे आहे . अनेक वेळा प्रत्यक्ष , अप्रत्यक्ष भेटून तुम्हाला याबाबत कल्पना देऊन देखील तुमच्या वागण्यात काहीच फरक पडलेला नसल्याने तुम्हाला संपविण्याशिवाय आम्हाला दुसरा पर्याय उरलेला नाही . तुम्ही वारंवार नगरसेवकांच्या अधिकारांवर घाला घालत आहात . तुम्ही असेस वागलात तर मी तुमच्या चेह-यावर काळे फासेन ,  तुमच्या चारित्र्यावर डाग लावीन . आम्ही तशी फिल्डिंग मंत्रालयातून लावलेली आहे . या पत्रानंतर व्यवस्थित वागल्यास आम्ही हे सर्व थांबवू अशी धमकी या पत्रात देण्यात आली आहे . तुम्ही ज्या नागरिकांना खूष करण्यासाठी हे सर्व परदर्शक कारभार करता त्या नागरिकांना आम्ही मतदानावेळी तीन हजार रुपये देऊन नगरसेवक म्हणून निवडून आले आहोत . तुमच्यावर अॅट्रोसिटी दाखल करू असेही या पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे . आमच्या मर्जीतील कंत्राटदार पालिकेत नेमा . त्याला प्रत्येक महिन्याला आम्हाला भेटायला सांगा तसेच तुम्ही पैसे खात नाही पण आम्ही लागतात असे या धामकिवजा पत्रात नमूद करण्यात आले आहे . 
    पालिकेतील उपायुक्त सध्या बावनकुळे व जमीर लेंगरेकर यांना देखील उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे .तुमच्या मुळेच हे अधिकारी नागरसेवकांशी मग्रुरीने वागत आहेत . व स्वतःला मुख्यमंत्री असल्याचे समजत आहेत . आयुक्त शिंदे यांनी मला हे पत्र सोमवारी प्राप्त झाले असल्याचे सांगितले . मी माझं वयक्तिक काम करीत नसून जनतेचीच काम करीत आहे . आयुक्त पदापेक्षा संवेदनशील असलेल्या पदांवर मी काम केले आहे . या पत्राला न घाबरता मी अजून जोमाने कामाला लागेन असेही शिंदे यांनी स्पष्ट केले . 

-  मागील अनेक दिवसापासून पनवेल महानगर पालिकेत सत्ताधारी भाजप नगरसेवक व आयुक्त शिंदे यांच्यात वाद पेटला आहे . आयुक्त मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप सत्ताधारी नगरसेवक खुलेआम करीत आहेत . नुकत्याच पार पडलेल्या पालिकेच्या महासभेत आयुक्तांविरोधात  अॅट्रोसिटी , अविश्वास ठराव आनण्यासंदर्भात उघडपणे चर्चा करण्यात आली होती .त्यामुळे पत्र पाठवणा-यांने मुद्दामून अनेक गोष्टी या पत्रात नमूद केल्या आहेत .  यासंदर्भात तक्रार नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे . दि. २३ रोजी हे पत्र पनवेल महानगर पालिकेला प्राप्त झाले आहे.

Web Title: Panvel Municipal Commissioner Dr. Sudhakar Shinde threatens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा