एनएमएमटीच्या ३० नवीन बसेस, बसेसची संख्या ४८२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 02:38 AM2018-09-12T02:38:56+5:302018-09-12T02:38:58+5:30

महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात ३० नवीन मिडी बसेस दाखल झाल्या आहेत.

NMMT's 30 new buses, number of buses 482 | एनएमएमटीच्या ३० नवीन बसेस, बसेसची संख्या ४८२

एनएमएमटीच्या ३० नवीन बसेस, बसेसची संख्या ४८२

Next

नवी मुंबई : महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात ३० नवीन मिडी बसेस दाखल झाल्या आहेत. यामुळे बसेसची संख्या ४८२ एवढी झाली आहे. शहरवासीयांना चांगली सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उपक्रमाने नवीन बसेस घेतल्या आहेत.
कोपरखैरणे डेपोमध्ये महापौर जयवंत सुतार यांच्या उपस्थितीमध्ये बसेसचे लोकार्पण करण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्र माच्या ८२ व्होल्व्हो बसेससह एकूण ४५२ बसेसच्या ताफ्यामध्ये ३0 नवीन मिडी बसेसची भर पडली असून आयशर व्होल्व्हो प्रकारच्या या बसेस सेमी अ‍ॅटोमॅटिक स्वरूपाच्या आहेत. यामध्ये अ‍ॅटोमॅटिक मॅन्युअल ट्रान्समिशन पद्धतीचा वापर करण्यात आला असून क्लचविरहित व गिअरचा कमीत कमी वापर करावा लागत असल्याने चालकांसाठी या बस अत्यंत आरामदायी आहेत. शहरात ७0 विविध मार्गांवरून एन.एम.एम.टी. बससेवा पुरविली जात असून त्यामधील मार्ग क्र मांक ८, २१, २२ अशा छोट्या रस्त्यांवरून मार्गक्रमण करणाऱ्या एन.एम.एम.टी. बसेसच्या विविध मार्गांवर या मिडी बसेस लाभदायी ठरणार आहेत.
या मिडी बसेसमुळे एन.एम.एम.टी. सेवा अधिक सुलभ व सुनियोजित पद्धतीने पुरविणे शक्य होणार असून याद्वारे नागरिकांकरिता अधिक चांगली बससेवा उपलब्ध होणार आहे.
याप्रसंगी ऐरोलीचे आमदार संदीप नाईक, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., स्थायी समितीचे सभापती तथा परिवहन समितीचे पदसिद्ध सदस्य सुरेश कुलकर्णी, कार्यक्र माचे निमंत्रक तथा परिवहन समितीचे सभापती रामचंद्र तथा आबा दळवी, इ प्रभाग समिती अध्यक्ष लता मढवी, नगरसेवक निवृत्ती जगताप, परिवहन समिती सदस्य प्रदीप गवस, राजू शिंदे, अब्दुल जब्बार खान, काशिनाथ पाटील, राजेंद्र इंगळे, वीरेश सिंग, सुधीर पवार, राजेंद्र आव्हाड, समीर बागवान तसेच महानगरपालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड, परिवहन उपक्र माचे व्यवस्थापक शिरीष आरदवाड व मुख्य लेखा व वित्त अधिकारी नीलेश नलावडे उपस्थित होते.

Web Title: NMMT's 30 new buses, number of buses 482

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.