कामोठेत जलवाहिनीची क्षमता वाढविण्याची गरज; अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:09 AM2019-05-13T00:09:37+5:302019-05-13T00:09:54+5:30

पनवेलमधील इतर वस्तीप्रमाणेच कामोठे येथे पाण्यासाठी तीच ओरड आहे. पुरेशा दाबाने तसेच मागणीप्रमाणे पाणी येत नसल्याने सेक्टर १२ मधील रहिवासी त्रस्त झाले आहेत.

 The need for improving the capacity of the Kamotheath water channel; Citizen stricken with insufficient water supply | कामोठेत जलवाहिनीची क्षमता वाढविण्याची गरज; अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त

कामोठेत जलवाहिनीची क्षमता वाढविण्याची गरज; अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त

Next

कळंबोली : पनवेलमधील इतर वस्तीप्रमाणेच कामोठे येथे पाण्यासाठी तीच ओरड आहे. पुरेशा दाबाने तसेच मागणीप्रमाणे पाणी येत नसल्याने सेक्टर १२ मधील रहिवासी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे येथील जलवाहिनीची क्षमता वाढवावी, अशी मागणी नागरिक व लोकप्रतिनिधींनी केली असून याबाबतचे पत्र सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाला देण्यात आले.
कामोठे वसाहतीकरिता सिडको नवी मुंबई महानगरपालिकेकडून पाणी घेते आणि ते सोसायटीला पुरवले जाते. या वसाहतीला मागणीप्रमाणे पाणीच मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणात ओरड सुरू आहे. कामोठेकरांना ३८ एमएलडीची आवश्यकता आहे. पण आज घडीला या ठिकाणी ३0 एमएलडीच्या जवळपास पाणी मिळत आहे. त्यामुळे सर्व सेक्टरमध्ये पाणीटंचाईच्या झळा पोहचत आहेत. सेक्टर १२ मध्येही पाण्याची टंचाई भासत आहे. काही सोसायट्यांना अतिशय कमी दाबाने पाणी मिळत असल्याची ओरड आहे. त्यामुळे त्या रहिवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागते. किमान गरजेपुरते त्यांना पाणी मिळावे यासाठी स्थानिक नगरसेवक दिलीप पाटील यांच्यासह सचिन गायकवाड यांनी सिडकोकडे पाठपुरावा सुरू केला आहे. या भागात सध्या १00 एमएमची वाहिनी आहे. त्याऐवजी २00 एमएमची वाहिनी नव्याने टाकण्यात यावी अशी मागणी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गजानन दलाल यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यांना दोन दिवसापूर्वी सचिन गायकवाड यांनी निवेदन देऊन याबाबत गांभीर्याने विचार करण्याची मागणी केली.

वाढीव एमएमच्या जलवाहिनीसाठी आमच्याकडे कामोठेकरांचे पत्र आलेले आहे. त्यासाठी आम्ही पण सकारात्मक आहोत. याविषयी वरिष्ठ पातळीवर चर्चा केल्यानंतर लवकरात लवकर निर्णय घेऊन या संदर्भात उपाययोजना करण्यात येईल.
- गजानन दलाल, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा सिडको

Web Title:  The need for improving the capacity of the Kamotheath water channel; Citizen stricken with insufficient water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.