ऐरोलीत मनसे पदाधिकाऱ्यास मारहाण  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 05:08 AM2018-12-28T05:08:21+5:302018-12-28T05:08:29+5:30

ऐरोलीमध्ये मनसेचे विभाग अध्यक्ष विश्वनाथ दळवी याला बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणी शिवसेना नगरसेवक राजू कांबळी व संतोष कांबळी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 MNS office bearers attacked | ऐरोलीत मनसे पदाधिकाऱ्यास मारहाण  

ऐरोलीत मनसे पदाधिकाऱ्यास मारहाण  

Next

नवी मुंबई : ऐरोलीमध्ये मनसेचे विभाग अध्यक्ष विश्वनाथ दळवी याला बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणी शिवसेना नगरसेवक राजू कांबळी व संतोष कांबळी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी दळवी यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. आॅक्टोबरमध्ये प्रभाग क्रमांक ११ व १४ मध्ये सुरू असलेले काम चांगले करावे यासाठी ठेकेदारास जाब विचारला होता. त्याचा राग नगरसेवकाने मनात धरला होता. बुधवारी रात्री घराबाहेर उभी केलेली मोटारसायकल रोडवर पाडली होती. तेथे असलेल्या राजू कांबळी व संतोष कांबळी यांना विचारणा केली असता त्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. लाकडी बांबूने डोक्यावर फटका मारला. यामुळे डोक्यावर जखम झाली असून उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आले आहे. याप्रकरणी रबाळे पोलीस स्टेशनमध्ये मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीचा मनसेच्या पदाधिकाºयांनी निषेध केला आहे. या प्रकरणाचा योग्य तपास केला जावा व आरोपींवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.

Web Title:  MNS office bearers attacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.