महापौर, उपमहापौरांची दालनाची प्रतीक्षा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 01:58 AM2017-07-26T01:58:43+5:302017-07-26T01:58:49+5:30

Mayor and Deputy Mayor waiting for house | महापौर, उपमहापौरांची दालनाची प्रतीक्षा कायम

महापौर, उपमहापौरांची दालनाची प्रतीक्षा कायम

Next

पनवेल : पनवेल शहर महानगरपालिकेची निवडणूक होऊन जवळपास दोन महिने उलटले आहेत, तरीही महापौर, उपमहापौरांच्या दालनाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. 
निवडून आलेल्या सदस्यांना सभागृहात बसण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने निकालानंतर महिन्याभराचा कालावधी उलटला तरी महापौर, उपमहापौराची निवडणूक झाली नव्हती. अखेर १० जून रोजी क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महापौर, उपमहापौरांच्या निवडीसाठी विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर पनवेल महापालिकेच्या महापौरपदी डॉ. कविता चौतमोल तर उपमहापौरपदी चारु शीला घरत यांची निवड करण्यात आली. मात्र, अद्याप महापौर, उपमहापौरांना बसण्यासाठी दालनच नसल्याने विकासकामे होणार कशी, असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे. 
महापालिकेच्या नव्याने बांधण्यात येणाºया इमारतीत महापौर, उपमहापौरांच्या दालनाचे काम सुरू आहे. याकरिता पालिकेने ६६ लाख रुपयांच्या निविदा काढल्या आहेत. महापौर, उपमहापौर यांच्याव्यतिरिक्त विरोधी पक्षनेता, सभागृह नेता, सभापती, स्थायी समिती सभापती आदींच्या दालनांची कामे या इमारतीच्या पहिल्या व दुसºया मजल्यावर सुरू आहेत. निवडणूक होऊन जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटून देखील दालनांची कामे अपूर्ण असल्याने महानगर पालिका प्रशासन व कार्यपद्धतीवर टीका होत आहे. महापौरांचे दालन तयार करण्यास दोन महिने लागत असतील तर सर्वसामान्यांची कामे कधी होणार, असा प्रश्न पनवेलकरांकडून विचारण्यात येत आहे. 
पनवेलला स्मार्ट सिटी बनविण्याचे ध्येय असलेल्या पालिकेला दोन महिन्यांत शहराचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांचे दालन अद्याप बनवता आलेले नाही. वास्तविक पाहता निवडणुकीपूर्वीच ही सर्व दालने तयार होणे गरजेचे होते. मात्र, कासवगतीने सुरू असलेल्या कामामुळे अद्यापही सर्व दालनांचे काम रखडले आहे. सध्याच्या घडीला पनवेल नगरपरिषदेच्या जुन्या इमारतीत पहिल्या मजल्यावर महापौर, उपमहापौरांना तात्पुरत्या स्वरूपात दालन पालिकेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आले आहेत.  

  • असे आहे दालन

महापौरांकरिता दुसºया मजल्याचा ३५० चौरस फुटांचे दालन तयार करण्यात आले. त्याचबरोबर ११०चौ. फू. अ‍ॅण्टी चेंबर आहे. ३५० चौ. फूट क्षेत्रफळाचा मिटिंग हॉल बनविण्यात आला आहे. त्यांच्या स्वीय सहायकासाठी ८० चौ. फुटाची केबिन आहे. 

Web Title: Mayor and Deputy Mayor waiting for house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.