एफएसआय देण्यास सरकार अनुकूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 02:50 AM2018-05-15T02:50:41+5:302018-05-15T02:50:41+5:30

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजी व फळ मार्केटमधील गाळ्यांना वाढीव एफएसआय देण्यासाठी सरकार सकारात्मक प्रयत्न करेल.

Government friendly to give FSI | एफएसआय देण्यास सरकार अनुकूल

एफएसआय देण्यास सरकार अनुकूल

Next

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजी व फळ मार्केटमधील गाळ्यांना वाढीव एफएसआय देण्यासाठी सरकार सकारात्मक प्रयत्न करेल. याविषयी प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे पाठवावा अशा सूचना पणन व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी प्रशासनास दिल्या आहेत. यामुळे दोन्ही मार्केटमधील व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
भाजी मार्केटचे धर्मवीर संभाजीराजे बाजार संकुल नामकरण करण्याच्या कार्यक्रमामध्ये भाजी व फळ मार्केटमधील वाढीव एफएसआयचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी व्यापारी प्रतिनिधी शंकर पिंगळे यांनी केली. दोन्ही मार्केटसाठीचा एफएसआय सिडकोकडे शिल्लक असून तो मिळावा असा आग्रह धरला. आमदार नरेंद्र पाटील, शरद सोनावणे यांनीही मार्केटमधील प्रश्न सोडविण्याची मागणी केली. शासनाच्या बदलत्या धोरणाचा येथील व्यापारावर परिणाम होत असल्याचेही स्पष्ट केले. पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी एफएसआयविषयी भूमिका स्पष्ट केली. मंत्री झाल्यानंतर मुंबई बाजार समितीचा एफएसआय हाच विषय सर्वप्रथम आमच्यासमोर आला, परंतु तो एफएसआयच्या घोटाळ्याचा होता. पण हा स्वतंत्र विषय असल्याचे समजले. परंतु याविषयी अद्याप कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. बाजार समितीने प्रस्ताव तयार करून तो आमच्याकडे पाठवून द्यावा आम्ही त्याविषयी सकारात्मक भूमिका घेवू, असे आश्वासन यावेळी देशमुख यांनी दिले.
फळ मार्केटचे माजी संचालक संजय पानसरे यांनी यापूर्वीच्या संचालक मंडळाने दोन्ही मार्केटसाठी एफएसआय देण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता असे निदर्शनास आणून दिले.
भाजी व फळ मार्केटमधील वाढीव एफएसआयचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्यामुळे व्यापाºयांनी समाधान व्यक्त केले आहे. भाजी मार्केटमधील व्यापारी त्यांच्या पावत्यांवर धर्मवीर संभाजीराजे बाजार संकुल असा उल्लेख अनेक वर्षांपासून करत होते. परंतु त्याला अधिकृतपणे मंजुरी नव्हती.
राज्य शासनाने अधिकृतपणे मार्केटला संभाजी महाराजांचे नाव दिल्यामुळेही व्यापाºयांनी आनंद व्यक्त केला.
आमदार मंदा म्हात्रे यांनी विस्तारित भाजी मार्केटचा प्रश्न शासनाने सोडविला. मार्केटला संभाजी महाराजांचे नाव देण्यापासून इतर प्रश्न सोडविले असून यापुढेही सरकार व्यापाºयांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
>हत्ता पद्धतीवर चर्चा
मनसेचे आमदार शरद सोनावणे यांनी हत्ता पद्धत कशी योग्य आहे हे भाषणामध्ये सांगितले. मंत्री महोदयांनी रात्री मार्केटमध्ये यावे. हत्ता पद्धतीच्या साहाय्याने होणाºया विक्रीमध्ये शेतकºयांचा फायदा कसा आहे प्रत्यक्षात दाखवितो असे सांगितले. हा धागा पकडून राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, कृषी माल हत्ता पद्धतीने विकला जावा इतर कोणत्याही पद्धतीने विकला जावा, पण शेतकºयांचा चांगला भाव मिळावा. शेतकºयांचा चांगला भाव मिळणे आवश्यक असून त्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले.
सेवा शुल्काचे अधिकार बाजार समित्यांना
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सेवा शुल्क स्वीकारण्याचा विषय गाजत आहे. सेवा शुल्क वसुलीवरून अधिकाºयांमध्येच मतभिन्नता आहे. प्रशासक सतीश सोनी सेवा शुल्क वसूल करण्यासाठी आग्रही आहेत. सचिव शिवाजी पहीनकर यांनी यासाठी कायद्यात तरतूद असणे आवश्यक असल्याची भूमिका व्यक्त केली आहे. यामुळे सेवा शुल्काचा विषय प्रलंबित आहेत. पणनमंत्री सुभाष देशमुख यांना पत्रकारांनी विचारल्यानंतर लवकरच सेवा शुल्क वसुलीचे अधिकार बाजार समित्यांना देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
१९६५ गाळेधारकांना लाभ
बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये ४५० चौरस फुटांचे ७३२ मोठे गाळे आहेत.
३०० चौरस फुटांचे २९७ छोटे गाळे आहेत. भाजीपाला मार्केटमध्ये २७ चौरस मीटरचे ९३६ गाळे आहेत.
व्यापाºयांनी गरजेप्रमाणे वाढीव बांधकाम केले आहे. ही बांधकामे नियमित करण्यासाठी वाढीव एफएसआय देण्यात यावा यासाठी व्यापाºयांनी अनेक वर्षांपासून मागणी केली आहे.
पणनमंत्र्यांनी वाढीव एफएसआयविषयी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे १९६५ गाळेधारकांना त्याचा लाभ होवू शकतो.
>एपीएमसीला राष्ट्रीय मार्केटचा दर्जा
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय मार्केटचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासाठीच्या सूचना प्रशासनास देण्यात आल्या आहेत. याविषयी कार्यवाही सुरू असल्याची माहिती प्रशासक सतीश सोनी यावेळी दिली. राष्ट्रीय मार्केटचा दर्जा मिळाल्यामुळे येथील सोयी- सुविधांमध्येही वाढ होणार आहे.

Web Title: Government friendly to give FSI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.