प्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 04:43 AM2018-08-20T04:43:54+5:302018-08-20T04:44:16+5:30

जलप्रदूषण रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी

Fishing Troubles due to Plastic Waste | प्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात

प्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात

Next

- अनंत पाटील

नवी मुंबई : खाडीकिनारी वाहून येणाºया प्लॅस्टिक आणि थर्माकोलमुळे शहरातील पारंपरिक मासेमारी व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामुळे येथील मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. जलप्रदूषण करणाºया रासायनिक कारखान्यांसह संबंधित घटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मच्छीमारांनी केली आहे.
पालघरपासून थेट सिंधुदुर्गपर्यंतच्या खोल समुद्रात स्थानिक मच्छीमार मासेमारी करतात. त्यासाठी बोटीतून १० ते १५ दिवस प्रवास करतात; परंतु अलीकडच्या काळात भरतीच्या पाण्याबरोबर माशांऐवजी प्लॅस्टिक आणि थर्माकोलचा कचरा मासेमारीसाठी लावलेल्या जाळ्यात अडकत आहे, त्यामुळे जाळे फाटून मच्छीमारांचे नुकसान होत आहे. जाळ्यात मासेही सापडत नाहीत आणि नुकसानही होत असल्याने मच्छीमार हवालदिल झाले आहेत.
समुद्रात तीन प्रकारची मासेमारी केली जाते. डोलनेट, गिलनेट आणि पर्सिनेट अशा प्रकारे असून, डोलनेट म्हणजे स्थित मासेमारी प्रकारात पारंपरिक पद्धतीने लहान बोटीतून दररोज मासेमारी केली जाते. गिलनेट बोटीतून चार ते पाच दिवसांचा प्रवास करून मासेमारी केली जाते. तर पर्सिनेट मासेमारी ट्रॉलर बोटीतून १० ते १५ दिवसांचा प्रवास करून खोल समुद्रात मासेमारी केली जाते. यात दररोज मासेमारी करणाºया डोलनेट मच्छीमारांना प्लॅस्टिक आणि थर्माकोल कचºयाचा मोठा फटका बसत आहे.
निवठ्या, खेकडे, आंग्रे, थिरले, खरबी मासे आणि लहान कोळंबी (जवळा) हा मासळीचा प्रकार खाडीकिनारी चिखलात सापडतो; पण प्लॅस्टिक, थर्माकोल तसेच पाण्यावर पसरणारे तेलाचे तवंग आदीमुळे ही मासळी मिळणेसुद्धा अवघड होऊन बसले आहे.
त्यामुळे आणि भरतीबरोबर तेलतवंगामुळे ही मासळी फारशी मिळत नाही. अंडी उबविण्यासाठी ही मासळी मार्च आणि एप्रिलमध्ये खोल समुद्रात जाते, त्यानंतर पावसाळ्यात किनाºयावर येते. मात्र, किनाºयावर वाहून येणाºया प्लॅस्टिक व थर्माकोलच्या कचºयामुळे या
माशांचे अस्तित्वही संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.
राज्य शासनाने प्लॅस्टिक आणि थर्माकोलचा वापर आणि उत्पादनावर बंदी घातली आहे. प्रभावी कार्यवाही केल्यास समुद्र आणि खाडीत आढळणाºया प्लॅस्टिक आणि थर्माकॉलच्या कचºयाला आळा बसेल. तसेच प्रक्रिया न करता रासायनमिश्रीत पाणी खाडीत सोडणाºया कारखान्यांवरही कडक कारवाई करण्याची गरज असल्याचे मच्छीमारांची मागणी आहे. विशेष म्हणजे, खाडी आणि समुद्रातील वाढत्या प्रदूषणामुळे माशांच्या प्रजनन प्रक्रियेवर परिणाम झाला आहे, त्यामुळे मासळीच्या अनेक जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
रायगडच्या किनारपट्टीसह ठाणे, पालघर, मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील स्थानिकांचा मासेमारी हा पारंपरिक व्यवसाय
आहे; परंतु हा व्यवसायही आता संकटात सापडल्याने खाडी आणि समुद्रातील प्रदूषण रोखण्यासाठी राज्य शासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे.

Web Title: Fishing Troubles due to Plastic Waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.