शहराचे प्रवेशद्वार केवळ कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 03:03 AM2019-02-19T03:03:27+5:302019-02-19T03:04:00+5:30

नागरिकांना प्रतीक्षा : २० वर्षांपासून फक्त अर्थसंकल्पात तरतूद

The city's entrance is only on paper | शहराचे प्रवेशद्वार केवळ कागदावरच

शहराचे प्रवेशद्वार केवळ कागदावरच

googlenewsNext

योगेश पिंगळे।

नवी मुंबई : २१ व्या शतकातील शहर म्हणून नवी मुंबई शहराची ओळख आहे. शहरात येणाऱ्या नागरिकांचे स्वागत आणि आभार मानण्यासाठी तसेच शहराच्या सौंदर्यात भर पडावी, यासाठी पालिकेमार्फत शहरातील पाच ठिकाणी प्रवेशद्वार उभारण्यात येणार आहेत; या कामासाठी मागील सुमारे २० वर्षांपासून अर्थसंकल्पातच निधीची तरतूद करण्यात येत असून प्रत्यक्षात कृतीकडे दुर्लक्ष झाले आहे. शहरातील नागरिकांनाही प्रवेद्वारांची प्रतीक्षा असून अर्थसंकल्पीय चर्चेनंतर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनादेखील या कामाचा विसर पडत आहे.

नवी मुंबई शहराकडे एक नियोजनबद्ध आणि आधुनिक शहर म्हणून पाहिले जाते. शहरात सिडकोच्या नियोजनबद्ध शहर मांडणीनंतर महापालिकेच्या माध्यमातून शहरात करण्यात आलेल्या विविध विकासकामांमुळे शहराचा नावलौकिक देशातच नाही तर देशाबाहेरदेखील झाला आहे. या नियोजनबद्ध शहरात देशाबाहेरील तसेच देशातील विविध राज्यांतील नागरिक विविध उपक्र मांची पाहणी करण्यासाठी येतात. नवी मुंबई शहरात असलेली विविध शासकीय कार्यालये, एमआयडीसीतील विविध कंपन्या, महाविद्यालये, शाळा, आयटी कंपन्या, मॉल, उद्याने आदी ठिकाणी हजारो नागरिक ये-जा करतात. शहरातून मुंबई, पुणे, ठाणे आदी भागात जाणारे महामार्ग असल्याने शहरातून प्रवास करणाºया नागरिकांचीही मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. या नागरिकांना शहराची हद्द माहीत व्हावी, शहराच्या सुशोभीकरणात भर पडावी, शहराचे वेगळेपण अधोरेखित व्हावे आणि शहरातून प्रवेश करणाºया नागरिकांचे स्वागत आणि आभार मानण्यासाठी प्रवेशद्वार उभारण्यात येणार होते.
शहरातील सीबीडी-बेलापूर, वाशी, ऐरोली, दिघा, शिळफाटा या भागात प्रवेशद्वार उभारण्यासाठी २००० पासून पालिकेच्या अर्थसंकल्पात मोठी तरतूददेखील करण्यात येत आहे. दरवर्षी महापालिकेच्या अर्थसंकल्पात प्रवेशद्वार उभारणीच्या कामासाठी लागणाºया निधीत वाढदेखील करण्यात येत आहे; परंतु प्रवेशद्वार उभारणीकडे प्रत्यक्षात दुर्लक्ष झाले आहे. नवी मुंबई शहर स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींवर उभे राहिलेले शहर आहे.
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवर वसलेल्या शहरात स्थानिक भूमिपुत्रांच्या गावांची ओळख राहावी, यासाठी गावांच्या सीमा हद्दीवरही प्रवेशद्वार उभारणार असल्याच्या घोषणा लोकप्रतिनिधींद्वारे निवडणुकींच्या वचननाम्यात करण्यात आल्या आहेत; परंतु महापालिकेची स्थापना होऊन २५ वर्षे पूर्ण होऊनदेखील शहराच्या प्रवेशाच्या ठिकाणी तसेच अनेक गावांच्या सीमाहद्दीवर प्रवेशद्वार बनले नसून लोकप्रतिनिधींच्या घोषणादेखील हवेतच विरल्या आहेत. दरवर्षी पालिका अर्थसंकल्पात चर्चा करताना प्रवेशद्वार या विषयावर लोकप्रतिनिधी आपली मते मांडतात; परंतु अर्थसंकल्पीय चर्चेनंतर गावांच्या आणि शहराच्या प्रवेशद्वारांकडे पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. शनिवार, १६ फेब्रुवारी रोजी पालिका प्रशासनाने स्थायी समिती सभेत २०१९-२० या वर्षीचा अर्थसंकल्प सादर केला असून, या अर्थसंकल्पातदेखील ४.४६ कोटी रु पयांची तरतूद करण्यात आली आहे; परंतु या वर्षी तरी शहरांना आणि गावांना प्रवेशद्वार मिळणार का? असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला पडला असून, नागरिक प्रवेशद्वारांच्या प्रतीक्षेत आहेत.

शहरात प्रवेशद्वार उभारण्यात येणार आहे, यासाठी डिझाइन तयार करण्यात आले असून, याबाबतचा प्रस्ताव महासभेच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे, त्यामुळे लवकरच प्रवेशद्वाराची कामे मार्गी लागतील.
- डॉ. रामास्वामी एन., पालिका आयुक्त

कुकशेत गावाच्या धर्तीवर हवे प्रवेशद्वार
च्नेरु ळ एमआयडीसी क्षेत्रातील हार्डिलिया कंपनीमुळे कुकशेत गाव विस्थापित करून नेरुळ सेक्टर - १४ येथे या गावाचे पुनर्वसन करण्यात आले आहे.
च्या स्थलांतरित झालेल्या गावाच्या हद्दीवर प्रवेशद्वाराच्या कमानी उभारण्यात आल्या आहेत, त्यामुळे या गावाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
च्याच धर्तीवर शहरातील सर्वच गावांना महापालिकेच्या माध्यमातून प्रवेशद्वार मिळावे.

Web Title: The city's entrance is only on paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.