घणसोलीत सीएम चषकची विनापरवाना जाहिरातबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 03:43 AM2018-12-20T03:43:07+5:302018-12-20T03:43:38+5:30

मागील काही दिवसांपासून भाजपातर्फे सीएम चषकच्या माध्यमातून ठिकठिकाणी स्पर्धा भरवल्या जात आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धांना राजकीय रंग दिला जात आहे.

Censorship of CM Chatter is unpredictable | घणसोलीत सीएम चषकची विनापरवाना जाहिरातबाजी

घणसोलीत सीएम चषकची विनापरवाना जाहिरातबाजी

Next

नवी मुंबई : सीएम चषकच्या नावाखाली घणसोली परिसरात भाजपातर्फे मोठ्या प्रमाणात विनापरवाना जाहिरातबाजी करण्यात आली आहे. विद्युत खांबावर तसेच रस्त्यावर कमानी उभारून मुख्यमंत्र्यांसह इतर नेत्यांचे विनापरवाना फलक झळकत आहेत; परंतु त्यावरील कारवाईकडे पालिकेची चालढकल होत असल्याने प्रशासनाच्या दुटप्पी धोरणाबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

मागील काही दिवसांपासून भाजपातर्फे सीएम चषकच्या माध्यमातून ठिकठिकाणी स्पर्धा भरवल्या जात आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धांना राजकीय रंग दिला जात आहे. स्पर्धांच्या ठिकाणी तसेच संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी करून त्यावर भाजपा नेत्यांचे फोटो झळकवले जात आहेत. अशाच प्रकारातून घणसोली कॉलनी परिसरातील रस्ते भाजपाच्या अनधिकृत जाहिरातबाजीने व्यापल्याचे दिसून येत आहेत. घणसोली गावालगतच्या मोकळ्या मैदानावर हा महोत्सव होत आहे; परंतु त्याची बॅनरबाजी घणसोली-कोपरखैरणे मार्गाला जोडणाऱ्या पामबीच मार्गावर करण्यात आलेली आहे, यामुळे हा क्रीडा महोत्सव आहे की जाहिरात महोत्सव, असा प्रश्न घणसोलीकरांना पडला आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात अनधिकृत जाहिरातबाजी सुरू असतानाही पालिकेकडून त्यावर कारवाई होत नसल्याचेही आश्चर्य व्यक्त होत आहे. इतर राजकीय अथवा सामाजिक संघटनेने विनापरवाना बॅनरबाजी केल्यास त्यावर तत्काळ कारवाई होते; परंतु घणसोलीत भाजपाचा सीएम चषक क्रीडा महोत्सव सुरू होण्याच्या आठवडा अगोदरपासून बॅनरबाजी करण्यात आली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून नवी मुंबईवर विशेष लक्ष देण्यात येत आहे, त्याकरिता येत्या काही दिवसांत अनेक राजकीय घडामोडी घडण्याचीही शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर सीएम चषकच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी करून भाजपाचा वातावरणनिर्मितीचा प्रयत्न सुरू असल्याचीही टीका होत आहे; परंतु प्रशासनाने मात्र आपला कारभार पारदर्शक ठेवून सरसकट अनधिकृत बॅनरबाजीवर कारवाईची मागणी होत आहे.

शहराला अनधिकृत बॅनरबाजीच्या विळख्यातून सोडवण्याची अत्यंत गरज आहे; परंतु पालिकेच्या अधिकाºयांकडून त्याकडे चालढकल होत आहे. परिणामी, घणसोली पामबीच मार्गावर तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात भाजपाच्या बॅनरबाजीला अभय मिळत आहे. संबंधित बॅनरबाजांवर गुन्हे दाखल करून पालिकेने आपल्या पारदर्शक कार्यपद्धतीचे दर्शन घडवावे.
- योगेश चव्हाण,
रहिवासी
 

Web Title: Censorship of CM Chatter is unpredictable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.