सिडकोची ग्रामपंचायत काळातील बांधकामांवरही कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 11:56 PM2019-01-04T23:56:38+5:302019-01-04T23:56:49+5:30

सिडकोने तुर्भे सेक्टर २४मध्ये ग्रामपंचायत काळातील पुरावे असलेल्या बांधकामांवर कारवाई केली आहे. १९७८ पासून रहिवासी असल्याचे दाखले व १९९५च्या सर्वेक्षणामध्ये पात्र असलेल्या झोपड्याही हटविल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

Action on construction of CIDCO Gram Panchayat period | सिडकोची ग्रामपंचायत काळातील बांधकामांवरही कारवाई

सिडकोची ग्रामपंचायत काळातील बांधकामांवरही कारवाई

Next

नवी मुंबई : सिडकोने तुर्भे सेक्टर २४मध्ये ग्रामपंचायत काळातील पुरावे असलेल्या बांधकामांवर कारवाई केली आहे. १९७८ पासून रहिवासी असल्याचे दाखले व १९९५च्या सर्वेक्षणामध्ये पात्र असलेल्या झोपड्याही हटविल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या अन्यायाविरोधात आंदोलन करण्याचा व वेळ पडल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा बेघर झालेल्या रहिवाशांनी दिला आहे.
शासनाने १९९५ पूर्वीच्या झोपड्या अधिकृत केल्या आहेत. सन २००० पर्यंतच्या झोपड्यांनाही अभय देण्यात आले आहे. अतिक्रमणविरोधी पथकांनी कारवाई करताना जुन्या बांधकामांवर कारवाई करू नये, असे अपेक्षित असते. परंतु सिडकोने तुर्भेमधील बांधकामांवर कारवाई करताना नागरिकांच्या पुराव्यांकडे दुर्लक्ष करून घरांवर जेसीबी फिरविला. १९७८ पासून येथे राहणाऱ्या प्रभावती लक्ष्मण खांदारे या ८० वर्षांच्या महिलेच्या डोक्यावरील छत हिरावून घेतले आहे. या अन्यायाविरोधात माहिती देताना त्यांनी सांगितले की, आम्ही ग्रामपंचायत असल्यापासून येथे वास्तव्य करीत आहोत. ग्रामपंचायतीच्या करपावत्याही आमच्याकडे आहेत. महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर १९९५ पासून मालमत्ता कर भरत आहोत. झोपडपट्टी सर्वेक्षणामध्येही आम्ही पात्र ठरलो आहोत. सर्व कागदोपत्री पुरावे असताना अतिक्रमणविरोधी पथकाने मनमानी करून आमची घरे उद्ध्वस्त केली असून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मनीषा शेट्टी यांचे वडील रामेश्वर उदमले यांचेही १९८० पासून येथे घर आहे. ग्रामपंचायत काळातील कर भरल्याच्या पावत्यांसह १९९५च्या झोपडपट्टी सर्वेक्षणाची पावतीही त्यांच्याजवळ आहे. घरात
कोणी नसताना त्यांचे घर पाडण्यात आले आहे. वडिलांना बसलेल्या धक्क्यामुळे मनीषा या माहेरून येथे आल्या असून, न्याय मिळावा यासाठी धडपडत आहेत.
तुर्भेमध्ये राहणाºया पिंकी राठोड यांच्या वडिलांचे व चुलत्यांचे घर या ठिकाणी आहे. त्यांच्याकडेही वास्तव्याचे सर्व पुरावे आहेत. अतिक्रमणविरोधी पथकाला आमच्याकडे पुरावे आहेत, त्यामुळे कारवाई थांबविण्यात यावी, अशी विनंती केली होती. परंतु कारवाईसाठी आलेल्या अधिकाºयांनी आमचे म्हणणे ऐकूनच घेतले नसल्याचे मत व्यक्त केले.
सिडकोने आमच्यावर अन्याय केला आहे. आम्हाला आमचे घर पुन्हा मिळावे व कारवाई केलेल्या अधिकारी व कर्मचाºयांवरच कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

कारवाईमुळे ८० वर्षांच्या आईला धक्का बसला आहे. १९७८ पासून आम्ही येथे राहत आहोत. सिडकोने आमच्यावर अन्याय केला असून याविरोधात आम्ही न्याय मिळेपर्यंत आंदोलन करू.
- कल्पना खांदारे,
पीडित, रहिवासी

आमच्याकडे घराचे सर्व पुरावे आहेत. आमची घरे १९८५ पासून येथेच आहेत. १९९५ च्या सर्र्वेक्षणाचे पुरावे असताना सिडकोने आम्हाला बेघर केले आहे.
- पिंकी राठोड,
रहिवासी

आई कामावर गेलेली असताना सिडकोने कारवाई केली. घरातील सर्वांना धक्का बसला आहे. हक्काचे घर उद्ध्वस्त केले असून, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे.
- मनीषा शेट्टी,
रहिवासी

Web Title: Action on construction of CIDCO Gram Panchayat period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cidcoसिडको