चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, ब्रिजभूषण सिंह यांच्यावर दाखल एफआयआरमध्ये आरोप काय आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 10:25 AM2023-06-02T10:25:06+5:302023-06-02T10:27:37+5:30

महिला कुस्तीपटूंनी २१ एप्रिल रोजी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात तक्रार केली.

wrestlers protest brij bhushan sharan singh 2 fir demands for sexual favours molestation | चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, ब्रिजभूषण सिंह यांच्यावर दाखल एफआयआरमध्ये आरोप काय आहेत?

चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, ब्रिजभूषण सिंह यांच्यावर दाखल एफआयआरमध्ये आरोप काय आहेत?

googlenewsNext

कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात दिल्लीत पैलवानांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली असून आता यात नोंदवलेल्या आरोपांची माहिती समोर आली आहे. २ एफआयआरमध्ये ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाची मागणी आणि विनयभंगाच्या १० तक्रारी आहेत.

एफआयआरमध्ये अशा १० प्रकरणांचा उल्लेख आहे, यामध्ये विनयभंगाच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. एफआयआरनुसार, यामध्ये चुकीचा स्पर्श करणे, कोणत्याही बहाण्याने पाठीवर हात ठेवण्याचा प्रयत्न करणे, असं म्हटले आहे.

ही तक्रार २१ एप्रिल रोजी कॅनॉट प्लेस पोलीस ठाण्यात देण्यात आली आणि दिल्ली पोलिसांनी २८ एप्रिल रोजी दोन एफआयआर नोंदवले. या दोन्ही एफआयआर आयपीसी कलम 354, 354A (लैंगिक छळ), 354D  आणि 34 अंतर्गत नोंदविण्यात आले आहेत. यात एक ते तीन वर्षांचा तुरुंगवास आहे. पहिल्या एफआयआरमध्ये सहा प्रौढ कुस्तीपटूंवरील आरोपांचा समावेश आहे आणि WFI सचिव विनोद तोमर यांचे नाव देखील आहे.

गर्लफ्रेंडसोबत समुद्रकिनाऱ्यावर फिरायला आलेल्या विद्यार्थांना मारहाण; मंगळुरूतील प्रकार

दुसरी एफआयआर एका अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिलेल्या आधारावर आहे. यात त्यांनी POCSO कायद्याच्या कलम १० देखील लागू आहे, ज्यामध्ये पाच ते सात वर्षांचा तुरुंगवास आहे. २०१२ ते २०२२ या कालावधीत भारतात आणि परदेशात कथितपणे उल्लेख केलेल्या घटना घडल्या. अल्पवयीन मुलीने नोंदवलेल्या तक्रारीच्या आधारे, आरोपीने तिला पकडले, फोटोसाठी पोज देण्याचा बहाणा केला, जाणून बुजून चुकीच्या पद्धतीन स्पर्श केला, असं यात म्हटले आहे.

६ महिला कुस्तीपटूंपैकी पहिल्या कुस्तीपटूच्या तक्रारीनुसार, हॉटेल रेस्टॉरंटमध्ये जेवताना आरोपीने मला त्याच्या टेबलावर बोलावले आणि मला स्पर्श केला.  कुस्ती महासंघाच्या कार्यालयात माझ्या परवानगीशिवाय मला स्पर्श केला. दुसऱ्या कुस्तीपटूच्या तक्रारीनुसार, मी मॅटवर झोपले असताना आरोपी माझ्याकडे आला, माझा प्रशिक्षक तिथे नव्हता, तेव्हा माझ्या परवानगीशिवाय माझा टी-शर्ट ओढला, असं या तक्रारीत म्हटले आहे. 

Web Title: wrestlers protest brij bhushan sharan singh 2 fir demands for sexual favours molestation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.