आपण सर्व शक्तीमानसाठी प्रार्थना करुया - विराट

By admin | Published: March 18, 2016 01:06 PM2016-03-18T13:06:56+5:302016-03-18T13:18:09+5:30

शक्तीमान या घोडयाला झालेल्या अमानुष मारहाणीवर टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने टि्वटरवरुन तीव्र संताप व्यक्त केला आहे.

We all pray for strength - Virat | आपण सर्व शक्तीमानसाठी प्रार्थना करुया - विराट

आपण सर्व शक्तीमानसाठी प्रार्थना करुया - विराट

Next

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १८ - उत्तराखंडमध्ये सरकारविरोधी आंदोलना दरम्यान शक्तीमान या घोडयाला केलेल्या अमानुष मारहाणीवर टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने तीव्र संताप व्यक्त केला आहे. शक्तीमानला झालेल्या मारहाणीने आपल्याला धक्का बसला असून, चीड आली आहे. 
या मुक्या, सुंदर प्राण्यावर झालेला हल्ला म्हणजे भ्याडपणा आहे. यापेक्षा डरपोकपणा असू शकत नाही असे संतप्त टि्वट विराटने केले आहे. शक्तीमानच्या या अवस्थेला जबाबदार असणा-यांवर कठोर कारवाई होईल अशी अपेक्षा करुया आणि आपण सर्व मिळून शक्तीमानसाठी प्रार्थना करु असे टि्वट विराटने केले आहे. 
शक्तीमानला काठीने हल्ला करणारा भाजप आमदार गणेश जोशीला पोलिसांनी शुक्रवारी सकाळी अटक केली आहे. या मारहाणीमध्ये शक्तीमानला आपला पाय गमवावा लागला. शक्तीमानच्या जखमेवर शस्त्रक्रिया करुन सध्या त्याला कुत्रिम पाय बसवण्यात आला आहे. 

Web Title: We all pray for strength - Virat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.