Vijay Mallya: विजय मल्ल्याला सुप्रीम कोर्टाचा झटाका! मालमत्ता होणार जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 05:25 PM2023-03-03T17:25:30+5:302023-03-03T17:29:49+5:30

देशातून काही वर्षापूर्वी फरार झालेल्या विजय मल्ल्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. विजय मल्ल्याला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे.

vijay mallya supreme court property seize | Vijay Mallya: विजय मल्ल्याला सुप्रीम कोर्टाचा झटाका! मालमत्ता होणार जप्त

Vijay Mallya: विजय मल्ल्याला सुप्रीम कोर्टाचा झटाका! मालमत्ता होणार जप्त

googlenewsNext

देशातून काही वर्षापूर्वी फरार झालेल्या विजय मल्ल्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. विजय मल्ल्यालासर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. मुंबई न्यायालयाने त्यांची मालमत्ता जप्त करण्याबाबत निर्णय दिला होता. मल्ल्या याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते, मात्र तेथूनही त्यांना दिलासा मिळालेला नाही. आता मालमत्ता जप्त करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. 

मल्ल्याला फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित करून त्याची मालमत्ता जप्त करण्याच्या मुंबई न्यायालयाच्या कारवाईला आव्हान देणारी विजय मल्ल्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. आता मल्ल्याला एकाच वेळी दोन मोठे धक्के बसले आहेत. एकीकडे आर्थिक गुन्हेगार राहणार आहेत, आणि मालमत्ताही जप्त होणार आहे.

गोष्ट एका राजाची! त्रिपुरामध्ये पहिल्याच प्रयत्नात आणला भाजपाच्या नाकी दम, कोण आहेत ते? वाचा 

'अशिलाकडून कोणतीही माहिती मिळाली नाही. ते स्वतः अंधारात असल्याचा दावा सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान मल्ल्याच्या वकिलांनी केला. मल्ल्या यांच्या बाजूने लढणारे वकील स्वतः अनेक मुद्द्यांवर स्पष्ट नव्हते.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये वकिलांनी केस लढण्यास नकार दिला होता. विजय मल्ल्या यांचे स्टेट बँक ऑफ इंडियासोबत काही आर्थिक वाद आहेत. याच प्रकरणात वकील ईसी अग्रवाल हे त्यांच्या वकिलाची भूमिका बजावत आहेत. मात्र नुकत्याच झालेल्या सुनावणीत ईसी अग्रवाल यांनी मल्ल्याचा खटला लढण्यास नकार दिला आहे. त्यांनी न्यायमूर्ती चंद्रचूड आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठाला सांगितले की, माझ्या माहितीनुसार विजय मल्ल्या अजूनही ब्रिटनमध्ये आहे. पण ते माझ्याशी बोलत नाहीत. माझ्याकडे फक्त त्यांचा ईमेल पत्ता आहे. आता आम्ही त्यांचा शोध घेऊ शकत नसल्यामुळे, मला त्यांचे प्रतिनिधित्व करण्यापासून मुक्त केले पाहिजे.

Web Title: vijay mallya supreme court property seize

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.