वरुण गांधींनी तडजोडीसाठी ३८० कोटी रुपये मागितले होते - ललित मोदी

By Admin | Published: July 1, 2015 10:13 AM2015-07-01T10:13:07+5:302015-07-01T11:59:11+5:30

भाजपा नेेते वरुण गांधी यांनी काँग्रेससोबतचे वाद मिटवण्यासाठी तब्बल ३८० कोटी रुपयांची मागणी केली होती असा गौप्यस्फोट ललित मोदी यांनी केला आहे.

Varun Gandhi had asked for Rs 380 crore for reconciliation - Lalit Modi | वरुण गांधींनी तडजोडीसाठी ३८० कोटी रुपये मागितले होते - ललित मोदी

वरुण गांधींनी तडजोडीसाठी ३८० कोटी रुपये मागितले होते - ललित मोदी

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १ - भाजपा नेेते वरुण गांधी यांनी काँग्रेससोबतचे वाद मिटवण्यासाठी तब्बल ३८० कोटी रुपये मागितले होते असा गौप्यस्फोट ललित मोदी यांनी केला आहे. तर वरुण गांधी यांच्या निकटवर्तीयांनी ललित मोदींच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे सांगत आरोप फेटाळून लावले आहेत. 

दररोज नवनवीन नेत्यांची पोलखोल करणारे आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी बुधवारी वरुण गांधींवर टीका केली. काही वर्षांपूर्वी वरुण गांधी हे माझ्या लंडनमधील निवासस्थानी भेट घेण्यासाठी आले होते. काँग्रेससोबतचा वाद मिटवू शकतो, यासाठी ३८० कोटी रुपये द्या असे वरुण गांधींनी सांगितल्याचा दावा ललित मोदींनी ट्विटरद्वारे केला आहे. वरुण गांधींनी हे प्रकरण मिटवण्यासाठी सोनिया गांधी यांची इटलीत राहणारी बहिण मदत करु शकते असे सांगितले होते, असे मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 

Web Title: Varun Gandhi had asked for Rs 380 crore for reconciliation - Lalit Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.