टॅक्सीत महिला प्रवाशासमोर हस्तमैथुन करणाऱ्या चालकाला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2018 10:47 AM2018-04-18T10:47:30+5:302018-04-18T10:49:13+5:30

टॅक्सी चालवत असताना चालक हस्तमैथुन करत होता.

Uber Driver Masturbates In Front Of Woman Passenger | टॅक्सीत महिला प्रवाशासमोर हस्तमैथुन करणाऱ्या चालकाला अटक 

टॅक्सीत महिला प्रवाशासमोर हस्तमैथुन करणाऱ्या चालकाला अटक 

Next

नवी दिल्ली -  राजधानी दिल्लीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका विकृत टॅक्सी चाकलाने महिला प्रवाशासमोर हस्तमैथुन केलं आहे. महिला प्रवाशाने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर त्या चालकाला अटक केली आहे. राजधानी नवी दिल्लीत राजपथ परिसरात 15 एप्रिल रोजी ही घटना घडली आहे. 

टॅक्सी चालवत असताना चालक हस्तमैथुन करत होता. चालक माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होता. मला त्याची ती नजर पाहून राग येत होता असा आरोप महिला प्रवाशाने केला आहे.  महिला प्रवाशाने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी चालकाला अटक केली आहे. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे वाहन परवानाही नसल्याचे समोर आले आहे. 

चालकाने कॅबमध्ये केलेली ही काही पहिली घटना नाही. यापूर्वीही आशाच प्रकारच्या घटना समोर आल्या आहेत.  महिला प्रवाशांसोबत अभद्रता आणि यौन शोषण घडल्याच्या घटना समोर आल्या आहे. 

Web Title: Uber Driver Masturbates In Front Of Woman Passenger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.