जळगाव रेल्वे स्थानकावर टीसीला मारहाण दोघांना अटक : पॅसेंजरच्या तिकिटावर एक्सप्रेसमध्ये प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2016 11:21 PM2016-04-19T23:21:31+5:302016-04-19T23:21:31+5:30

जळगाव : पॅसेंजरच्या तिकिटावर एक्सप्रेसमध्ये प्रवास करणार्‍या नंदकिशोर गणपत जोशी (वय ४०) व बाळ गणपत जोशी (वय ४६) दोन्ही रा.अशोक नगर, सातपुर, नाशिक या दोन्ही भावांनी प्रधान तिकीट परीक्षक (टी.सी.) जनार्दन मोतीराम जंगले (वय ५३ रा. रेल्वे क्वॉर्टर, जळगाव) यांना मारहाण केल्याची घटना मंगळवारी सकाळी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक तीनवर घडली. दोघं भावांवर रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

Two arrested for attacking TC at Jalgaon railway station: Passengers traveling on the passenger ticket | जळगाव रेल्वे स्थानकावर टीसीला मारहाण दोघांना अटक : पॅसेंजरच्या तिकिटावर एक्सप्रेसमध्ये प्रवास

जळगाव रेल्वे स्थानकावर टीसीला मारहाण दोघांना अटक : पॅसेंजरच्या तिकिटावर एक्सप्रेसमध्ये प्रवास

Next
गाव : पॅसेंजरच्या तिकिटावर एक्सप्रेसमध्ये प्रवास करणार्‍या नंदकिशोर गणपत जोशी (वय ४०) व बाळ गणपत जोशी (वय ४६) दोन्ही रा.अशोक नगर, सातपुर, नाशिक या दोन्ही भावांनी प्रधान तिकीट परीक्षक (टी.सी.) जनार्दन मोतीराम जंगले (वय ५३ रा. रेल्वे क्वॉर्टर, जळगाव) यांना मारहाण केल्याची घटना मंगळवारी सकाळी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक तीनवर घडली. दोघं भावांवर रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
प्रधान तिकीट परीक्षक (टी.सी.) जनार्दन मोतीराम जंगले यांची मंगळवारी सकाळी जळगाव रेल्वे स्टेशनवर ड्युटी होती. सव्वा सात वाजता मुंबईकडून येणार्‍या महानगरी एक्सप्रेस प्लॅटफार्म क्रमांक तीनवर आली असता जंगले प्रवाशांचे तिकीट तपासत होते. या गाडीने नाशिक येथून आलेले जोशी बंधू यांच्याकडे जंगले यांनी तिकिटाची मागणी केली असता त्यांनी नाशिक-भुसावळ या पॅसेंजरचे तिकीट दाखविले.
दंडावरून झाला वाद
एक्सप्रेस गाडीत पॅसेंजरच्या तिकिटावर प्रवास केला म्हणून टी.सी.जंगले यांनी त्यांना ५७० रुपये दंड भरण्याचे सांगितले असता त्यांनी त्यास नकार देत शंभर रुपये घ्यायचे असतील तर घ्या म्हणत जंगले यांच्याशी वाद घातला. दंडाची पावती घेतल्याशिवाय तुम्हाला येथून जाता येणार नाही, असे ठणकावून सांगितल्याने जोशी यांनी त्यांच्या कानशिलात लगावली. हा प्रकार पाडून अन्य प्रवाशांनी गर्दी केली.टी.सी.वर आरोप करत दोन्ही भावांनी आणखी त्यांना मारहाण करायला सुरुवात केली.
रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल
या मारहाणीमुळे जंगले यांनी दोन्ही भावांना रेल्वे पोलिसात चौकीत उपनिरीक्षक खलील शेख यांच्याकडे आणले. तेथे जोशी व जंगले यांनी झालेला प्रकार कथन केला. जंगले यांच्या फिर्यादीवरून जोशी बंधूवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. त्यानंतर उपनिरीक्षक शेख यांनी त्यांना भुसावळ न्यायालयात हजर केले असता न्या.वराडे यांनी त्यांची कारागृहात रवानगी केली.

Web Title: Two arrested for attacking TC at Jalgaon railway station: Passengers traveling on the passenger ticket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.