त्रिपुरामध्ये पुन्हा डावी आघाडीच विजयी होेईल, भाकपचा दावा; चाचण्यांचे निष्कर्ष शंकास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 01:21 AM2018-03-01T01:21:29+5:302018-03-01T01:29:50+5:30

त्रिपुरा विधानसभेच्या निवडणुकांत भाजपा जिंकेल, असा निष्कर्ष २ जनमत चाचण्यांनी काढला असला, तरी त्यात तथ्य नसल्याचा दावा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (भाकप) सरचिटणीस सुरावरम सुधाकर रेड्डी यांनी केला आहे.

In Tripura, Left Front will win, CPI claims; The test results are questionable | त्रिपुरामध्ये पुन्हा डावी आघाडीच विजयी होेईल, भाकपचा दावा; चाचण्यांचे निष्कर्ष शंकास्पद

त्रिपुरामध्ये पुन्हा डावी आघाडीच विजयी होेईल, भाकपचा दावा; चाचण्यांचे निष्कर्ष शंकास्पद

Next

हैदराबाद : त्रिपुरा विधानसभेच्या निवडणुकांत भाजपा जिंकेल, असा निष्कर्ष २ जनमत चाचण्यांनी काढला असला, तरी त्यात तथ्य नसल्याचा दावा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (भाकप) सरचिटणीस सुरावरम सुधाकर रेड्डी यांनी केला आहे. त्रिपुरात डावी आघाडीच पुन्हा सत्तेवर येईल, असेही ते म्हणाले.
बिहार व दिल्ली विधानसभा निवडणुकानंतर झालेल्या जनमत चाचण्यांचे निष्कर्ष चुकीचे निघाले होते. याकडे लक्ष वेधून ते म्हणाले की, ईशान्य भारतातील विधानसभा निवडणुकांच्या जनमत चाचण्यांचे निष्कर्ष शंकास्पद वाटतात. त्रिपुरातील विधानसभा निवडणुकीत भाजपाप्रणीत आघाडीला ५१ टक्के मते मिळतील, असे एका जनमत चाचणीमध्ये म्हटले आहे, तर दुसºया चाचणीत डाव्या आघाडीला ४५ किंवा ४६ टक्के मते मिळतील, असे म्हटले आहे. म्हणजे परस्परांविरुद्ध लढणा-या या पक्षांना मिळणा-या मतांच्या टक्केवारीत खूपच कमी फरक शिल्लक राहातो.
त्रिपुरात १८ फेब्रुवारीला मतदान झाले. एका मतदारसंघात माकपचे उमेदवार रामेंद्र देबवर्मा यांच्या निधनामुळे मतदान झाले नव्हते. ते १२ मार्च रोजी होईल. त्रिपुरामध्ये २५ वर्षे सत्तेवर असलेल्या डाव्या आघाडीला पराभूत करण्याच्या तयारीने भाजपा यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी त्रिपुरात जोरदार प्रचार केला होता. भाजपाने या निवडणुकीत इंडिजिनियस पीपल्स फ्रंट आॅफ त्रिपुरा (आयपीएफटी) पक्षाशी युती केली. भाजपाने ५१ तर आयपीएफटीने नऊ जागा लढविल्या. काँग्रेसने ५९ जागा लढविल्या.
भाजपा हारणार - सी व्होटरचा निष्कर्ष
सी-व्होटर जनमत चाचणीतून त्रिपुरात डावी आघाडी सत्तेवर येईल असा निष्कर्ष सी-आला आहे. त्रिपुरामध्ये डाव्या आघाडीला २६ ते ३४ जागांवर विजय मिळेल व ४४.३ टक्के मते या आघाडीला मिळतील असेही त्यात नमुद केले आहे. भाजप व मित्र पक्षांच्या आघाडीला २४ ते ३२ जागांवर व ४२.८ टक्के मते मिळतील, तर काँग्रेसला ७.२ टक्के मते मिळून फक्त दोन जागांवर विजय मिळेल असेही चाचणीच्या निष्कर्षात म्हटले आहे.

Web Title: In Tripura, Left Front will win, CPI claims; The test results are questionable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.