रूपाणी सरकारचा आज शपथविधी, पंतप्रधान मोदी, शहा यांच्यासह भाजपा व घटकपक्षांचे मुख्यमंत्री राहणार उपस्थित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 03:54 AM2017-12-26T03:54:06+5:302017-12-26T03:54:27+5:30

अहमदाबाद : गुजरातमध्ये विजय रुपाणी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारचा मंगळवारी शपथविधी होणार आहे.

Today, the Prime Minister of the Swatantra Government, Prime Minister Modi, Shah will be the Chief Minister of the BJP and the constituency | रूपाणी सरकारचा आज शपथविधी, पंतप्रधान मोदी, शहा यांच्यासह भाजपा व घटकपक्षांचे मुख्यमंत्री राहणार उपस्थित

रूपाणी सरकारचा आज शपथविधी, पंतप्रधान मोदी, शहा यांच्यासह भाजपा व घटकपक्षांचे मुख्यमंत्री राहणार उपस्थित

Next

अहमदाबाद : गुजरातमध्ये विजय रुपाणी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारचा मंगळवारी शपथविधी होणार आहे. गांधीनगरमधील सचिवालय इमारतीशेजारील पटांगणावर हा भव्य सोहळा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्यासह भाजपा व ‘रालोआ’ घटकपक्षांचे १८ मुख्यमंत्री शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. गुजरातमध्ये भाजपने सलग सहाव्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळविला आहे.
मुख्यमंत्री विजय रुपाणी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यासह अन्य मंत्री यावेळी शपथ घेतील. राज्यपाल ओ. पी. कोहली त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. भाजपचे प्रदेशाध्यक्ष जीतू वाघानी यांनी सांगितले की, या कार्यक्रमासाठी काही केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. याशिवाय काही धार्मिक संस्थांच्या प्रतिनिधींनाही आमंत्रित करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)
>काही नवे चेहरेही
गत सरकारमध्ये मंत्री असलेले काही वरिष्ठ नेते पुन्हा मंत्रिमंडळात सहभागी होऊ शकतात. कॅबिनेटसाठी भूपेंद्र सिंह चूडासमा, कौशिक पटेल, गणपत वसावा, दिलीप ठाकूर, बाबूभाई बोखिरिया आणि प्र्रदीपसिंह जडेजा यांच्या नावाची चर्चा आहे. काही नव्या चेहºयांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो.
गत सरकारमधील ६ मंत्री निवडणुकीत पराभूत झाले आहेत. विधानसभा अध्यक्ष राहिलेले रमनलाल वोरा हेही पराभूत झाले आहेत. या निवडणुकीत भाजपने १८२ सदस्यीय सभागृहात ९९ जागा जिंकून बहुमत मिळविले आहे.

Web Title: Today, the Prime Minister of the Swatantra Government, Prime Minister Modi, Shah will be the Chief Minister of the BJP and the constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.