ईडी अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यातील मास्टरमाइंड शाहजहान शेख यांना अटक; बंगालमध्ये पहाटेच झाली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 08:22 AM2024-02-29T08:22:47+5:302024-02-29T08:26:18+5:30

शहाजहान शेख यांना पश्चिम बंगालमधील २४ उत्तर परगणा जिल्ह्यातील मिनाखान येथून अटक करण्यात आली. शहाजहान शेखला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.

TMC leader Sheikh Shahjahan arrested by West Bengal Police from the Minakhan area in North 24 Parganas | ईडी अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यातील मास्टरमाइंड शाहजहान शेख यांना अटक; बंगालमध्ये पहाटेच झाली कारवाई

ईडी अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यातील मास्टरमाइंड शाहजहान शेख यांना अटक; बंगालमध्ये पहाटेच झाली कारवाई

गेल्या काही दिवसापूर्वी बंगालमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला झाल्याची घटना समोर आली होती. या हल्ल्यातील मास्टरमाइंड असलेले शाहजहान शेख यांना आज पोलिसांनी अटक केली आहे. शहाजहान शेख यांना पश्चिम बंगालमधील २४ उत्तर परगणा जिल्ह्यातील मिनाखान येथून अटक करण्यात आली. शहाजहान शेखला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. संदेशखळी येथील अनेक महिलांचा छळ केल्याचा आरोप शहाजहान यांच्यावर आहे. याशिवाय अनेकांनी जमीन बळकावल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी विरोधक सातत्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारला कोंडीत पकडत आहेत.

कोलकाता उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पश्चिम बंगाल पोलिसांनी ही अटक केली आहे, यामध्ये तृणमूल काँग्रेसचे नेते शाहजहान शेख यांच्या अटकेवर कोणतीही बंदी नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

शहाजहान शेख हे स्थानिकांमध्ये प्रसिद्ध आहेत. पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील संदेशखळी या सीमावर्ती भागात ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसशी संबंधित शहाजहान शेख हे एक प्रभावशाली व्यक्ती आहेत.काही दिवसापूर्वी त्यांच्या निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांनी रेशन घोटाळ्याप्रकरणी छापा टाकला होता, त्यावेळी समर्थकांनी ईडी आणि सीएपीएफ कर्मचाऱ्यांवर हल्ला केला होता. 

उत्तर २४ परगणा जिल्ह्यात जमीन हडप आणि स्थानिक महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपांवरून शाहजहान शेख आणि त्याच्या समर्थकांविरोधात निदर्शने सुरू आहेत. गेल्या महिन्यात, कथित रेशन घोटाळ्याच्या संदर्भात त्याच्या घरावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या  ईडीच्या अधिकाऱ्यांवर जमावाने हल्ला केल्यानंतर शाहजहान शेख फरार झाले होते.

Web Title: TMC leader Sheikh Shahjahan arrested by West Bengal Police from the Minakhan area in North 24 Parganas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.