.. म्हणून त्या मुस्लिम इंजिनिअरने घातला बुरखा

By Admin | Published: July 5, 2017 09:44 AM2017-07-05T09:44:49+5:302017-07-05T11:34:33+5:30

मारहाणीच्या भीतीने अलिगडमधील नजमुल हसन हा 42 वर्षीय इंजिनिअर व्यक्ती बुरखा घालून रेल्वे स्टेशनवर फिरताना दिसला.

Therefore, the Muslim engineer put it | .. म्हणून त्या मुस्लिम इंजिनिअरने घातला बुरखा

.. म्हणून त्या मुस्लिम इंजिनिअरने घातला बुरखा

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

आग्रा, दि. 5- रेल्वे प्रवासादरम्यान मुस्लिम तरूणांना गेल्या काही दिवसांपूर्वी मारहाणी झाली होती. या मारहाणीच्या भीतीने अलिगडमधील नजमुल हसन हा 42 वर्षीय इंजिनिअर व्यक्ती बुरखा घालून रेल्वे स्टेशनवर फिरताना आढळल्याची घटना घडली आहे. रविवारी दुपारी अलिगड रेल्वे स्टेशनवर पोलिसांनी त्या बुरखा घालून फिरणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतलं. द टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे. 
 
रेल्वे स्टेशनवरील तिकिट काऊंटरवर तो व्यक्ती असताना त्याच्या हालचाली तेथे उपस्थित लोकांना संशयास्पद वाटल्या. त्यानुसार स्टेशनवरील लोकांनी पोलिसांना या संबंधीची माहिती दिली होती. त्या इंजिनीअर व्यक्तीला अटक करण्याच्याआधी पोलिसांनी त्याच्या हालचालींवर काही वेळासाठी लक्ष ठेवलं होतं. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली. तपासणी दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून रेल्वे ट्रेनमध्ये मुस्लीम व्यक्तींना मारहाण होत असल्याच्या घटनांमुळे त्यापासून स्वतःला वाचविण्यासाठी मी माझी ओळख लपवायचा प्रयत्न करत होतो, असं नजमुल हसन यांनी पोलिसांना सांगितलं. 
 
पोलिसांनी तपासणीनंतर नजमुल हसन यांना सोडून दिलं. पण त्यानंतर लोकांमध्ये सध्या असलेली असुरक्षिततेने वरिष्ठ पोलिसांना विचारात टाकलं. 
 
 
आणखी वाचा :
 

अमेरिकेतल्या 53 विमानतळांवर भारतीयांना आता तपासणीशिवाय प्रवेश

 
 
 
नजमुल हसन कसिमपूर पॉवर स्टेशनमध्ये सह-अभियंता म्हणून कार्यरत आहेत. रेल्वे प्रवासादरम्यान जुनेद या मुस्लीम तरूणाची झालेली हत्या आणि एकदा बिहारहून परतत असताना स्वतः मुस्लीम असल्याने मला आलेला अनुभव यामुळे मनात भीती बसली आहे, असं नजमुल हसन यांनी सांगितलं.
 
बिहार वरून परतत असताना नजमुल यांना आलेला अनुभवही त्यांनी पोलिसांना सांगितला. "गेल्या आठवड्यात अलिगड रेल्वे स्टेशनवर उतरत असताना एका सहप्रवाशाला चुकून माझी बॅग लागली होती. त्यामुळे तो प्रवासी खाली पडला. त्यावेळी त्या प्रवाशाने माझ्यावर मारहाणीचा आरोप करत मला माझ्या धर्मावरून बोलायला सुरूवात केली. तसंच सगळ्या लोकांसमोर अपशब्दसुद्धा वापरले होते. हा सगळा प्रकार सुरू असताना स्टेशनवर असलेली एकही व्यक्ती भांडण सोडवायला आली नाही. उलट काही जणांनी त्या माणसाला साथ देत मुस्लीम धर्मावरून अजून अपशब्द बोलायला सुरूवात केली. 
 
दिल्ली राहणारे माझे नातेवाईक आजारी असल्याने मला रविवारी तेथे जावं लागतं, पण मारहाणीच्या घटना ऐकुन एकट्याने प्रवास करायला भीती वाटते. म्हणूनच पुरूष असल्याची ओळख लपविण्यासाठी मी बुरखा घातला. महिलांना कधीही लक्ष केलं जात नाही आणि मी सुरक्षित राहीन, असा विचार केला असल्याचं नजमुल हसन यांनी सांगितलं. 
 
 
आणखी वाचा :
 

"स्टार" कासवांची तस्करी करणा-या पित्रापुत्राला बेड्या, 200 कासव जप्त

 

 
 

Web Title: Therefore, the Muslim engineer put it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.