"तेव्हा सत्ताधाऱ्यांना आपल्याच संस्कृतीची लाज वाटत होती"

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 09:06 AM2024-02-05T09:06:46+5:302024-02-05T09:07:18+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका; इतिहास पुसून प्रगती शक्य नाही

Then the rulers were ashamed of their own culture, Says modi in assam | "तेव्हा सत्ताधाऱ्यांना आपल्याच संस्कृतीची लाज वाटत होती"

"तेव्हा सत्ताधाऱ्यांना आपल्याच संस्कृतीची लाज वाटत होती"

गुवाहाटी : ‘स्वातंत्र्यानंतर सत्तेत असलेल्या सत्ताधाऱ्यांना धार्मिक स्थळांचे महत्त्व समजले नाही आणि राजकीय कारणांमुळे त्यांना आपल्याच संस्कृतीची लाज वाटत होती,’ अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे ११,६०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी केली. 

मोदी म्हणाले की, कोणताही देश इतिहास पुसून प्रगती करू शकत नाही. तथापि, गेल्या दहा वर्षांत परिस्थिती बदलली आहे. सुरू केलेले प्रकल्प केवळ ईशान्येकडीलच नव्हे, तर उर्वरित दक्षिण आशियाशीही दळणवळण मजबूत करतील. गेल्या दहा वर्षांत आसाममध्ये शांतता परत आली आहे आणि ७,०००हून अधिक लोक शस्त्रे सोडून मुख्य प्रवाहात परतले आहेत. गेल्या दशकात विक्रमी संख्येने पर्यटकांनी या भागाला भेट दिली आहे.

‘असाममाला’ प्रकल्प नेमका काय आहे ?
nपंतप्रधानांनी ‘असाममाला’ रस्त्यांच्या दुसऱ्या प्रकल्पाचेही लोकार्पण केले. 
nया टप्प्यात एकूण ३४४४ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने ४३ नवीन रस्ते आणि ३८ काँक्रीट पूल बांधले जातील.

११,६०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन

पंतप्रधान मोदी यांनी खानापारा येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमात सुमारे ११,६०० कोटी रुपयांच्या राज्य आणि केंद्राच्या अनुदानित पायाभूत सुविधा प्रकल्पांचे लोकार्पण केले. 

त्यामध्ये कामाख्या मंदिर कॉरिडॉर (४९८ कोटी रुपये), विमानतळ टर्मिनलपासून सहा पदरी रस्ता (३५८ कोटी), नेहरू स्टेडियममध्ये सुधारणा (८३१ कोटी) आणि चंद्रपूर येथे नवीन क्रीडा संकुलाचा (३०० कोटी) समावेश आहे.

विपश्यनेमुळे जीवनातील तणाव, समस्या दूर होतील 
nविपश्यना ही प्राचीन भारताची एक अनोखी देणगी तसेच आधुनिक विज्ञान आहे, ज्याद्वारे तरुण आणि वृद्ध लोकांना जीवनातील तणाव आणि समस्यांना तोंड देण्यासाठी मदत होऊ शकते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 
nविपश्यना गुरू एस. एन. गोयंका यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त त्यांच्या डिजिटल भाषणात मोदी म्हणाले की, ध्यान आणि विपश्यना हे एकेकाळी त्यागाचे माध्यम म्हणून पाहिले जात होते; परंतु आता ते व्यावहारिक जीवनात व्यक्तिमत्त्व विकासाचे माध्यम बनले आहे. विपश्यनेची शिकवण समस्यांवर उपाय शोधण्यात मदत करू शकते. विपश्यना हा आत्मनिरीक्षण ते आत्मपरिवर्तन असा प्रवास आहे आणि आजच्या सर्व आव्हानांवर उपाय आहे.

 

Web Title: Then the rulers were ashamed of their own culture, Says modi in assam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.