आश्चर्य ! आत्महत्या करण्यासाठी फ्लायओव्हरवरुन उडी मारुनही वाचला

By admin | Published: August 2, 2016 01:33 PM2016-08-02T13:33:22+5:302016-08-02T13:44:14+5:30

आत्महत्या करण्यासाठी फ्लायओव्हरवरुन उडी मारुनदेखील तरुण आश्चर्यकारकरित्या बचावला असल्याची घटना घडली आहे

Surprise! Lying on the flyover, he also jumped to suicide | आश्चर्य ! आत्महत्या करण्यासाठी फ्लायओव्हरवरुन उडी मारुनही वाचला

आश्चर्य ! आत्महत्या करण्यासाठी फ्लायओव्हरवरुन उडी मारुनही वाचला

Next
>ऑनलाइन लोकमत - 
अहमदाबाद, दि. 02 - आत्महत्या करण्यासाठी फ्लायओव्हरवरुन उडी मारुनदेखील तरुण आश्चर्यकारकरित्या बचावला असल्याची घटना घडली आहे. 50 फूटावरुन उडी मारुनदेखील हा तरुण जिवंत आहे. आत्महत्या करण्यासाठी तरुणाने फ्लायओव्हरवरुन उडी मारली आणि त्याचवेळी खालून जात असलेल्या एका गाडीवर तो पडला. ज्यामुळे आश्चर्यकारकरित्या त्याचा जीव वाचला आहे. 
 
महेश पटेल असं या तरुणाचं नाव आहे. आत्महत्या करण्याच्या हेतून त्याने अहमदाबादमधील सीटीएम क्रॉस रोडवरील फ्लायओव्हरवरुन उडी घेतली. मात्र खालून जात असलेल्या कारवर आदळल्याने त्याचा जीव वाचला आहे.  त्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. गाडीचंही प्रचंड नुकसान झालं आहे. 
 
घटनेनंतर महेश पटेलला तात्काळ एलजी रुग्णालयात भर्ती करण्यात आलं. अमरायवाडी परिसरातील सामाजिक कार्यकर्ता हर्षद पटेलने महेश पटेलला उडी मारताना पाहिल्याचं सांगितलं आहे. 
 

Web Title: Surprise! Lying on the flyover, he also jumped to suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.