टू-जीच्या तपासामधून सीबीआयप्रमुख सिन्हांनी दूर राहावे - सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

By admin | Published: November 20, 2014 04:02 PM2014-11-20T16:02:26+5:302014-11-20T16:30:54+5:30

सीबीआय प्रमुख रणजित सिन्हा यांची टू-जी स्पेक्ट्रम घोटाळयाचा तपासासंबंधी भूमिका संशयास्पद असल्याने त्यांनी या तपासापासून दूर राहावे असे निर्देश गुरूवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले.

Supreme Court directives: CBI chief should stay away from CBI probe by 2G | टू-जीच्या तपासामधून सीबीआयप्रमुख सिन्हांनी दूर राहावे - सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

टू-जीच्या तपासामधून सीबीआयप्रमुख सिन्हांनी दूर राहावे - सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

Next
ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. २० - सीबीआय प्रमुख रणजित सिन्हा यांची टू-जी स्पेक्ट्रम घोटाळयाचा तपासासंबंधी भूमिका संशयास्पद असल्याने त्यांनी या तपासापासून दूर राहावे असे निर्देश गुरूवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिल्याने रणजित सिन्हा यांच्या सीबीआय प्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. 
सर्वोच्च न्यायालयाचे वकिल प्रशांत भूषण यांनी न्यायालयात सांगितले होतेे की, सीबीआयप्रमुख रणजित सिन्हा हे आपल्या निवासस्थानी आरोप असलेल्या व्यक्तींची भेट घेतात. या आरोपात थोडेफार तथ्य आहे असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत. टू-जीच्या तपासासंबंधी सिन्हा यांची भूमिका संशयास्पद आहे असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. या आरोपाची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने रणजित सिन्हा यांना टू-जीच्या तपासापासून दूर राहण्याचे निर्देश दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने असे निर्देश दिल्याने टू-जी घोटाळयाच्या तपासाला मोठी कलाटणी मिळाली आहे असे मानण्यात येत आहे. दरम्यान, विशेष म्हणजे, रणजित सिन्हा हे सीबीआयपप्रमुख पदावरून निवृत्त होण्यास केवळ काही दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने त्यांना टू-जीच्या तपासापासून दूर राहण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

 

Web Title: Supreme Court directives: CBI chief should stay away from CBI probe by 2G

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.