सनी देओलला एकीकडे दिलासा, तर दुसरीकडे डोकेदुखी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 06:37 AM2019-05-05T06:37:11+5:302019-05-05T06:38:00+5:30

चित्रपट अभिनेता सनी देओलला एकीकडे दिलासा मिळाला, तर दुसरीकडे समस्या उभी राहिली आहे.

 Sunny Deol's relief on one hand, on the other hand, increased headache | सनी देओलला एकीकडे दिलासा, तर दुसरीकडे डोकेदुखी वाढली

सनी देओलला एकीकडे दिलासा, तर दुसरीकडे डोकेदुखी वाढली

googlenewsNext

चंदीगड  -  चित्रपट अभिनेता सनी देओलला एकीकडे दिलासा मिळाला, तर दुसरीकडे समस्या उभी राहिली आहे. पंजाबच्या गुरदासपूर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या तिकिटावर प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सनीला एकाच वेळी अनेक मोर्चांवर तोंड द्यावे लागत आहे.
सनी देओलच्या नावावरून भाजप सध्या अडचणीत सापडला आहे. त्याच्या नावाबाबत भाजपने निवडणूक आयोगाचा दरवाजा ठोठावला आहे. मतदार यादी व इतर दस्तावेजांमध्ये त्याचे नाव अजय सिंह धर्मेंद्र देओल असे लिहिलेले आहे, ही खरी भाजपची डोकेदुखी आहे. हेच नाव ईव्हीएमवर येणे साहजिक असले तरी या नावाने त्याला कोणीही ओळखत नाही. त्यामुळे ईव्हीएमवर सनी देओल असे नाव यावे, यासाठी भाजपने निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल केला. हे प्रकरण तडीला लावण्याची जबाबदारी भाजपने पठाणकोटचे महापौर अनिल वासुदेवा यांच्याकडे सोपविली होती. ती त्यांनी यशस्वीरीत्या निभावलीही. ईव्हीएम व मतपत्रिकेवर आता सनी देओल नाव लिहिण्याची त्यांनी मंजुरी मिळवली.
एक प्रकरण मार्गी लागले असतानाच सनीसमोर दुसरी समस्या उभी राहिली आहे. यावेळी शिवसेना हिंदचे राष्टÑीय अध्यक्ष निशांत शर्मा यांनी सनीला धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणात अडकवले आहे. अमृतसर व मोहालीमध्ये याबाबत तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, त्यात म्हटले आहे की, धार्मिक भावना दुखावल्याबद्दल त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी. रोड शो दरम्यान सनी देओल ज्या वाहनावर पाय सोडून बसला होता, तेथे भगवान शिवाचे चित्र होते. सनीचे पाय देवाच्या चित्राला लागत होते, अशी तक्रार आहे. या समस्येतून सनी देओल कसा मार्ग काढील, हे आता पाहावे लागेल.

Web Title:  Sunny Deol's relief on one hand, on the other hand, increased headache

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.