उमेदवारीसाठी अनिवासींचे तेलंगणात जोरदार प्रयत्न; टीआरएस व जन समितीवर दबाव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 05:21 AM2019-02-14T05:21:52+5:302019-02-14T05:22:48+5:30

तेलंगण राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी उमेदवार निवडीची प्रक्रियाही अजून सुरू केलेली नसताना मोठ्या संख्येतील अनिवासी भारतीय (एनआरआय) या पक्षांच्या कार्यालयाचे उंबरठे तिकीट मागणारे अर्ज घेऊन झिजवत आहेत.

Strong attempts by NRIs for Telangana for candidature; The pressure on the TRS and the people's committee | उमेदवारीसाठी अनिवासींचे तेलंगणात जोरदार प्रयत्न; टीआरएस व जन समितीवर दबाव

उमेदवारीसाठी अनिवासींचे तेलंगणात जोरदार प्रयत्न; टीआरएस व जन समितीवर दबाव

Next

हैदराबाद : तेलंगण राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी उमेदवार निवडीची प्रक्रियाही अजून सुरू केलेली नसताना मोठ्या संख्येतील अनिवासी भारतीय (एनआरआय) या पक्षांच्या कार्यालयाचे उंबरठे तिकीट मागणारे अर्ज घेऊन झिजवत आहेत.
या अनिवासी भारतीयांच्या पाठिराख्यांचा प्रचंड दबाब तेलंगण राष्ट्र समिती (टीआरएस), आणि तेलंगण जन समिती (टीजेएस) या प्रमुख राजकीय पक्षांवर येत आहे. हे पक्ष आधीच काळजीत आहेत, कारण या पक्षांच्या नेत्यांकडे राज्यातील १७ जागांसाठी इच्छूक असलेल्यांची भली मोठी यादी आहे. सत्ताधारी असलेल्या तेलंगण राष्ट्र समितीवर साहजिकच या अनिवासी भारतीयांच्या पाठिराख्यांचा सर्वात जास्त दबाब आहे.
राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत टीआरएसने हुजुरनगर मतदारसंघातून अनिवासी भारतीय शनामपुडी सैदी रेड्डी
यांना तेलंगण प्रदेश काँग्रेस
समितीचे अध्यक्ष एन. उत्तमकुमार
रेड्डी यांच्या विरोधात उभे केले होते. परंतु, शमानपुडी एस. रेड्डी पराभूत झाले. दुसरे एक इंग्लंडमधील अनिवासी भारतीय उद्योजक
डॉ. पागिडिपट्टी देवय्या यांनी वर्धान्नापेट मतदार संघात टीजेएसकडून निवडणूक लढवली; परंतु तेही पराभूत झाले.

भाजपाकडील गर्दी कमी
तरीही अनिवासी भारतीयांना उमेदवारीसाठी धडपड सुरू केली आहे. आधी भाजपाकडे उमेदवारीसाठी गर्दी होईल, असा अंदाज होता; पण विधानसभा निवडणुकांत भाजपाला फारच कमी जागा मिळाल्याने बरेचसे अनिवासी भारतीय टीआरएसकडेच धावत आहेत. काँग्रेसकडे येणाऱ्या अनिवासी भारतीयांची संख्या त्या मानाने अधिक आहे.

Web Title: Strong attempts by NRIs for Telangana for candidature; The pressure on the TRS and the people's committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.