पंचायतींमधील ‘सरपंच पती’ संस्कृती बंद करा

By admin | Published: April 25, 2015 01:33 AM2015-04-25T01:33:45+5:302015-04-25T01:33:45+5:30

देशभरातील पंचायतींमध्ये फोफावत चाललेली ‘सरपंच पती’ संस्कृती संपविण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथे केले

Stop the 'Sarpanch husband' culture in Panchayats | पंचायतींमधील ‘सरपंच पती’ संस्कृती बंद करा

पंचायतींमधील ‘सरपंच पती’ संस्कृती बंद करा

Next

नवी दिल्ली : देशभरातील पंचायतींमध्ये फोफावत चाललेली ‘सरपंच पती’ संस्कृती संपविण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथे केले. दारिद्र्य निर्मुलन आणि शिक्षणाच्या प्रचार-प्रसारासाठी निर्वाचित ग्राम प्रतिनिधींनी नेतृत्व करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मार्गदर्शन करीत होते. यावेळी त्यांनी सरपंच महिलांच्या कामकाजात त्यांच्या पतींच्या हस्तक्षेपाचा मुद्दा आवर्जून उपस्थित केला. कुणा एका व्यक्तीने त्यांना आपली ओळख एसपी (सरपंच पती) अशी करून दिली होती. याकडे लक्ष वेधताना मोदी म्हणाले, कायद्याने महिलांना अधिकार दिले आहेत. त्यानुसार त्यांना संधी मिळाली पाहिजे; परंतु बहुतांश ठिकाणी हे एसपीच काम करीत आहेत. ही सरपंच पती संस्कृती त्वरित संपुष्टात आली पाहिजे. जेणेकरून महिलांना प्रगतीचे द्वार खुले होईल. याप्रसंगी मोदींच्या हस्ते ई-पंचायत आणि इतर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

 

Web Title: Stop the 'Sarpanch husband' culture in Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.