28 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार; स्कायमेटचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2018 07:43 AM2018-05-13T07:43:00+5:302018-05-13T07:43:00+5:30

यंदा चार दिवस आधीच मान्सून केरळमध्ये पोहोचणार

southwest monsoon to hit kerala on may 28 skymet predicts | 28 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार; स्कायमेटचा अंदाज

28 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार; स्कायमेटचा अंदाज

googlenewsNext

नवी दिल्ली: मान्सून 28 मे रोजी केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज स्कायमेटनं व्यक्त केला आहे. मान्सून 20 मे रोजी अंदमान आणि निकोबार बेटावर पोहोचेल. यानंतर तो 24 मे रोजी श्रीलंकेत दाखल होईल आणि त्यानंतर बंगालच्या उपसागरावरुन मान्सूनचा प्रवास सुरू होईल, असा अंदाज स्कायमेटनं व्यक्त केला आहे. 

मान्सून 28 मे रोजी केरळमध्ये दाखल होईल, अशी माहिती स्कायमेटचे उपाध्यक्ष महेश पलावत यांनी दिली. मान्सून अपेक्षेपेक्षा चार दिवस आधीच केरळमध्ये दाखल होईल, असंही त्यांनी सांगितलं. केरळमध्ये मान्सून साधारणत: एक जूनला दाखल होतो. मात्र यंदा तो चार दिवस आधीच केरळमध्ये पोहोचेल, अशी शक्यता स्कायमेटनं वर्तवली. यंदाचा मान्सून 100 टक्के सामान्य राहणार असल्याचा अंदाज 4 एप्रिल रोजी स्कायमेटनं व्यक्त केला होता. 

भारतीय हवामान विभागानं पाऊस सामान्य राहील, अशी शक्यता व्यक्त केली आहे. यंदा पाऊसमान कमी राहण्याची शक्यता कमीच असल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे. पावसाचं प्रमाण सामान्य राहण्याची शक्यता साधारणत: 42 टक्के असेल, असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. तर पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता 12 टक्के असेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. 
 

Web Title: southwest monsoon to hit kerala on may 28 skymet predicts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.