त्यांचे मोबाइल २४ तासांसाठी जप्त करा, ड्रायव्हरांना ठोठवा पाच हजार रुपये दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2018 02:59 AM2018-07-08T02:59:57+5:302018-07-08T03:00:10+5:30

उत्तराखंडमध्ये कार चालविताना मोबाइलवर बोलत असल्याचे आढळल्यास तुम्हाला केवळ दंडच केला जाणार नाही, तर तुमचा मोबाइलही किमान एका दिवसासाठी जप्त करण्यात येणार आहे.

 Seize their mobile for 24 hours, injure drivers for Rs 5,000 | त्यांचे मोबाइल २४ तासांसाठी जप्त करा, ड्रायव्हरांना ठोठवा पाच हजार रुपये दंड

त्यांचे मोबाइल २४ तासांसाठी जप्त करा, ड्रायव्हरांना ठोठवा पाच हजार रुपये दंड

Next

नैनिताल - उत्तराखंडमध्ये कार चालविताना मोबाइलवर बोलत असल्याचे आढळल्यास तुम्हाला केवळ दंडच केला जाणार नाही, तर तुमचा मोबाइलही किमान एका दिवसासाठी जप्त करण्यात येणार आहे. तसे आदेशच नैनिताल उच्च न्यायालयाने शुक्रवारी उत्तराखंड पोलिसांना दिले आहेत.
देशाच्या सर्व भागांत वाहन चालवत असताना मोबाइलवर बोलण्याचे त्यामुळे काही वेळा अपघात होतात, तर काही वेळा अपघात होता-होता टळतात. त्यामुळे वाहन चालवताना मोबाइलवर बोलण्यास बंदी असली, तरी त्याचे सर्रास उल्लंघन होत असल्याच्या बाबीकडे बोट ठेवून नैनिताल उच्च न्यायालयाने अशा चालकांना दंडही ठोठावा आणि त्यांच्या हातातील मोबाइल काढून घेऊ न, त्यांना तो २४ तासांनंतरच परत करा, असे पोलिसांना सांगितले आहे.
उत्तराखंडचा बराच भाग डोंगराळ असून, त्यामुळे तिथे अपघात होण्याचे प्रमाण एरवीही अधिक आहे. त्यातच मोबाइलवर बोलण्याच्या नादात चालकांकडून अपघात होत असल्याचे लक्षात आल्याने न्या. राजीव शर्मा यांनी हे आदेश दिले. वाहन चालविताना मोबाइलवर बोलणारे अनेक जण दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालतात. या प्रकारांना आळा घालण्यासाठी मोबाइलच २४ तासांसाठी जप्त करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. परिवहन विभाग व वाहतूक पोलीस यांच्यावर ही जबाबदारी टाकण्यात आली आहे.
गेल्याच महिन्यात उच्च न्यायालयाने मोबइलवर बोलणाºयांना किमान ५ हजार रुपये दंड ठोठावण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर काल मोबाइल जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. (वृत्तसंस्था)
 

Web Title:  Seize their mobile for 24 hours, injure drivers for Rs 5,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.