‘सरोगसी’ने आई झालेल्या महिलेला मातृत्व रजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 03:42 AM2018-02-09T03:42:52+5:302018-02-09T03:42:57+5:30

सरोगसीद्वारे मूल झालेल्या केंद्र सरकारच्या महिला कर्मचाºयांना मातृत्व रजेचा अधिकार आहे, असे निर्देश सरकारने दिले आहेत. या महिलांना २६ आठवड्यांची सुटी मिळू शकेल.

'Sarogsi' gives mother to motherhood leave | ‘सरोगसी’ने आई झालेल्या महिलेला मातृत्व रजा

‘सरोगसी’ने आई झालेल्या महिलेला मातृत्व रजा

googlenewsNext

नवी दिल्ली : सरोगसीद्वारे मूल झालेल्या केंद्र सरकारच्या महिला कर्मचाºयांना मातृत्व रजेचा अधिकार आहे, असे निर्देश सरकारने दिले आहेत. या महिलांना २६ आठवड्यांची सुटी मिळू शकेल.
केंद्रीय विद्यालयातील एका शिक्षिकेच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला होता. या महिलेला सरोगसीच्या माध्यमातून जुळे मुले झाली होती. पण, ती मुलांची जैविक आई नाही, असे कारण देत महिलेला मातृत्व रजा नाकारण्यात आली होती. यावर न्यायालयाने स्पष्ट केले होते की, सदर महिला त्या मुलांची आई आहे. त्यामुळे तिला मातृत्व रजेचा हक्क आहे. महिला कर्मचाºयांकडून जेव्हा मातृत्व रजेची मागणी होते तेव्हाच ही सरोगसी प्रकारातील आहे काय हे स्पष्ट होते. तथापि, सरोगसी प्रकरणात मूल प्राप्त करणारी आणि गर्भवती महिला या दोघीही कर्मचारी असतील तर, अशा प्रकरणात सक्षम अधिकाºयांनी याबाबत योग्य तो निर्णय घेण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले होते.

Web Title: 'Sarogsi' gives mother to motherhood leave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.