महिला आरक्षण मंजूर करा, सोनिया गांधी यांनी लिहिले पंतप्रधान मोदींना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 04:48 AM2017-09-22T04:48:05+5:302017-09-22T04:48:17+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या बहुमताच्या आधारे सात वर्षे रखडलेले महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर करून घ्यावे, अशी विनंती काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे.

Sanction women reservation, Sonia Gandhi wrote to Prime Minister Modi | महिला आरक्षण मंजूर करा, सोनिया गांधी यांनी लिहिले पंतप्रधान मोदींना पत्र

महिला आरक्षण मंजूर करा, सोनिया गांधी यांनी लिहिले पंतप्रधान मोदींना पत्र

Next

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या बहुमताच्या आधारे सात वर्षे रखडलेले महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर करून घ्यावे, अशी विनंती काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे.
लोकसभा व राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी एकतृतीयांश जागा राखीव ठेवण्याची तरतूद असलेले १०८वे घटनादुरुस्ती विधेयक राज्यसभेने सन २०१०मध्ये मंजूर करून लोकसभेकडे परत पाठविले होते. पण ते लोकसभेत मंजूर झालेले नाही. निवडणूक प्रचारात आश्वासन देणाºया मोदी यांनी हे विधेयक मंजूर करावे, असा आग्रह माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी केला होता.
त्याआधी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनीही लोकसंख्येच्या ५० टक्के महिलांना आरक्षण द्यायला हवे, असे सांगितले होते.
>राजीव गांधींनीच घेतला होता पुढाकार
पत्रात सोनिया गांधी म्हणतात की, महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने या विधेयकाचे काँग्रेसने नेहमीच समर्थन केले आहे. यापुढेही आमचा त्यासाठी पाठिंबा राहील. महिलांना पंचायती व नगरपालिकांमध्ये आरक्षण देण्यासाठी राजीव गांधी पंतप्रधान असताना काँग्रेसनेच पुढाकार घेतला. त्या वेळी विरोधी पक्षांनी ते विधेयक बराच काळ राज्यसभेत रोखून ठेवले. परंतु अखेरीस ७३वी व ७४वी घटनादुरुस्ती मंजूर होऊन ते आरक्षण प्रत्यक्षात आले, याचेही गांधी यांनी मोदींना स्मरण दिले.
>लोकसभेत ६२ महिला सदस्य
राजकीय पक्षच कमी महिलांना उमेदवारी देत असल्याने लोकसभा व राज्य विधानसभांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व अल्प राहिले आहे.टक्केवारीच्या दृष्टीनेही संख्या अत्यल्प असली तरी आजवरची ती सर्वाधिक आहे. याआधीच्या १५व्या लोकसभेत ५८ महिला निवडून आल्या होत्या.

Web Title: Sanction women reservation, Sonia Gandhi wrote to Prime Minister Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.