नोकरीची संधी... आयकर विभागात हाेणार १२ हजार पदांची भरती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 05:52 AM2024-02-05T05:52:24+5:302024-02-05T05:53:24+5:30

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अध्यक्षाची माहिती

Recruitment of 12 thousand posts in income tax department | नोकरीची संधी... आयकर विभागात हाेणार १२ हजार पदांची भरती

नोकरीची संधी... आयकर विभागात हाेणार १२ हजार पदांची भरती

नवी दिल्ली : आयकर विभागात सध्या १० ते १२ हजार पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी विभागाकडून लवकरच प्रक्रिया सुरू केली जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत दिली.  सध्या आयकर विभागात एकूण ५५ हजार कर्मचारी आहेत. 

नुकत्याच सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रलंबित करदावे निकाली काढण्याची घोषणा केली. २००९-२०१० पर्यंतच्या काळातील २५ हजार रुपयांची बाकी आणि २०१०-११ ते २०१४-१५ या काळातील १० हजारांच्या बाकीसंबंधी सर्व नोटिसा मागे घेतल्या जाणार आहेत. यात १९६२ पासून प्रलंबित असलेली १.११ कोटी प्रकरणे आहेत. या प्रकरणांतील एकूण रक्कम ३,५०० ते ३,६०० कोटींच्या घरात आहे. सरकारच्या या निर्णयामुळे ८० लाखांहून अधिक करदात्यांना लाभ होणार आहे. याबाबत गुप्ता यांनी सांगितले की, २५ हजारांपर्यंतची थकबाकी मागे घेण्याची घोषणा केल्याने करदात्यांना एक लाखापर्यंत दिलासा मिळू शकतो. (वृत्तसंस्था)

निवडणूक काळात राेकड जप्ती वाढली 
nविधानसभा निवडणुकांमध्ये राेख रक्कम जप्त हाेण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचे नितीन गुप्ता म्हणाले. 
nगेल्यावर्षी झालेल्या मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझाेराम या राज्यांच्या निवडणुकांमध्ये १,७६० काेटींचा मुद्देमाल जप्त केला. 
nत्यापूर्वीच्या निवडणुकीपेक्षा हा आकडा ७ पट जास्त हाेता. २०२२मध्ये निवडणुकांत जप्तीचे प्रमाण २०१७च्या तुलनेत ६ पटीने वाढल्याचे आयकर विभागाने म्हटले हाेते.

Web Title: Recruitment of 12 thousand posts in income tax department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.