ममता आदिवासी विरोधी; राष्ट्रपती पदाच्या निवडणूक ‘संग्रामात’ पश्चिम बंगालमध्ये भाजपची पोस्टरबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 05:17 PM2022-07-16T17:17:34+5:302022-07-16T17:22:30+5:30

"ममता बॅनर्जी आदिवासी समाजातील उमेदवाराचे समर्थन न करता, दुसऱ्याचेच समर्थन करत आहे. त्या आदिवासी समाजाच्या जवळ येण्यास कचरत आहेत. ही भिन्नता होती आणि राहील ही."

Presidential election BJP calls mamata banerjee is anti tribal puts posters in west bengal | ममता आदिवासी विरोधी; राष्ट्रपती पदाच्या निवडणूक ‘संग्रामात’ पश्चिम बंगालमध्ये भाजपची पोस्टरबाजी

ममता आदिवासी विरोधी; राष्ट्रपती पदाच्या निवडणूक ‘संग्रामात’ पश्चिम बंगालमध्ये भाजपची पोस्टरबाजी

Next

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. यातच, भाजपने येथे पोस्टरबाजी सुरू केली आहे. या पोस्टरवर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आदिवासी विरोधी असल्याचे म्हटले आहे. या पोस्टरवर एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटोही आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत टीएमसीने यशवंत सिन्हा यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.




नेमकं काय लिहिलं आहे पोस्टरवर? -
या पोस्टरवर लिहिले आहे, भाजपने एका आदिवासी समाजातील महिलेला देशाच्या सर्वोच्च पदासाठी उमेदवारी दिली आहे. असे करून भाजपने देशातील सर्व आदिवासी समाजाचा सन्मान केला आहे. ही आदिवासी समाजासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

या पोस्टरवर पुढे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. यात म्हण्यात आले आहे, की ममता बॅनर्जी आदिवासी समाजातील उमेदवाराचे समर्थन न करता, दुसऱ्याचेच समर्थन करत आहे. त्या आदिवासी समाजाच्या जवळ येण्यास कचरत आहेत. ही भिन्नता होती आणि राहील ही.


आपचाही यशवंत सिन्हा यांना पाठींबा -
अरविंद केजरिवाल यांच्या आपने विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांनी दिल्ली आणि पंजाबची ताकद युपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यामागे उभी करण्याचा निर्णय घेतला आहे. आपच्या पॉलिटिकल अफेअर कमिटीच्या बैठकीत शनिवारी हा निर्णय घेण्यात आला. यानंतर राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी प्रसार माध्यमांना ही माहिती दिली. 
 

 

Web Title: Presidential election BJP calls mamata banerjee is anti tribal puts posters in west bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.