पीएम मोदींच्या ताफ्याने रुग्णवाहिकेसाठी केला मार्ग मोकळा; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 03:48 PM2022-09-30T15:48:16+5:302022-09-30T15:57:26+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोन दिवस गुजरात दौरा सुरू आहे, आज मोदी यांनी गांधीनगरमध्ये वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. या दौऱ्यातील पीएम मोदींच्या ताफ्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Pm narendra Modi's convoy cleared the way for the ambulance Video viral on social media | पीएम मोदींच्या ताफ्याने रुग्णवाहिकेसाठी केला मार्ग मोकळा; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

पीएम मोदींच्या ताफ्याने रुग्णवाहिकेसाठी केला मार्ग मोकळा; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Next

अहमदाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोन दिवस गुजरात दौरा सुरू आहे, आज मोदी यांनी गांधीनगरमध्ये वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. यासह गुजरातमधील विकास कामांचा शुभारंभ मोदींच्या हस्ते होणार आहे. सध्या या दौऱ्यातील पीएम मोदींच्या ताफ्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ अहमदाबाद ते गांधीनगर मार्गावरील आहे. पीएम मोदी यांचा ताफा  कार्यक्रमस्थळी जात असताना मार्गावर एक रुग्णवाहिका आल्याचे दिसत आहे, या रुग्णवाहिकेला रस्ता देण्यासाठी पंतप्रधान मोदी यांचा ताफा बाजूला थांबवला असल्याचे दिसत आहे. अहमदाबादमधील कार्यक्रम संपल्यानंतर गांधीनगरला परतत असताना मागून रुग्णवाहिका येत होती. रुग्णवाहिका आल्याचे दिसताच पंतप्रधान मोदी यांनी आपला ताफा थांबवण्याचा आदेश दिला, आणि रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करुन दिला. या कृतीचे सोशल मीडियावर कौतुक होते आहे.

देशाला मिळाली तिसरी वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस; पीएम मोदींनी दाखवला हिरवा झेंडा

देशाला मिळाली तिसरी वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोन दिवसाचा गुजरात दौरा सुरू आहे. आज पंतप्रधान मोदींनी गांधीनगरमध्ये वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. देशाला आता तिसरी वंदे भारत ट्रेन मिळाली आहे. ही ट्रेन मुंबई ते गुजकरातमधील गांधीनगर अशी चालणार आहे. पंतप्रधान मोदी ट्रेनला हिरवा झेंडा दाखवत असताना भारत माता की जय च्या घोषणाबाजी सुरू होत्या.

वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यात येणार आहेत. ही पूर्णपणे एसी असणार आहे. त्यासोबतच स्लाइडिंग दरवाजे, व्यक्तिगत वाचनासाठी दिवा, मोबाइल चार्जिंग पॉइंट, अटेंडेंट कॉल बटन, बायो-टॉयलेट, स्वचालित  द्वार, सीसीटीवी कॅमेरे, रिक्लाइनिंग सुविधा, आरामदायक सीट असणार आहेत.  

नुकताच रेल्वे मंत्रालयाने मुंबई ते अहमदाबाद दरम्यान वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस चालविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता मुंबई सेंट्रल ते गांधीनगर दरम्यान रविवार सोडून दररोज धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी  सकाळी १०. ३० वाजता गांधीनगर येथून वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस ट्रेनच्या पहिल्या फेरीला हिरवा झेंडा दाखवणार आहे. प्रवाशांसाठी वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस  अहमदाबाद  स्थानकावरून सकाळी १४. ०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी १९.३५ वाजता पोहचले.

 

गहलोत यांच्या निवडीबद्दल प्रश्नचिन्ह, काँग्रेस अध्यक्षपदासाठी अन्य नावांचा विचार सुरू 

वेळापत्रक

मुंबई सेंट्रल येथून सकाळी ६.२० वाजता सुटेल आणि दुपारी १२.३० वाजता गांधीनगरला पोहचेल.  गांधीनगर येथून दुपारी १४.०५ वाजता सुटेल रात्री १९.३५ वाजता मुंबई सेंट्रलला पोहचेल  सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार शुक्रवार आणि शनिवार या दिवशी ही गाडी धावणार आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम". 

Web Title: Pm narendra Modi's convoy cleared the way for the ambulance Video viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.