PM Modi Speech : लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी करू शकतात 'या' मोठ्या घोषणा; लोकांना होणार थेट फायदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 08:04 PM2022-08-11T20:04:59+5:302022-08-11T20:08:58+5:30

Independence Day Speech: अत्यावश्यक आणि दीर्घकालीन उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या किमतीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात मोठी घोषणा करणार असल्याचे समजते. 

pm modi likely to shed more focus on health in this year independence day speech | PM Modi Speech : लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी करू शकतात 'या' मोठ्या घोषणा; लोकांना होणार थेट फायदा!

PM Modi Speech : लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी करू शकतात 'या' मोठ्या घोषणा; लोकांना होणार थेट फायदा!

Next

नवी दिल्ली :  देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. दरम्यान, 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून पंतप्रधाननरेंद्र मोदी जीवरक्षक औषधांच्या किमतींबाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. अत्यावश्यक आणि दीर्घकालीन उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या किमतीबाबत पंतप्रधाननरेंद्र मोदी आपल्या भाषणात मोठी घोषणा करणार असल्याचे समजते. 

पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांचे लाल किल्ल्यावरून हे 9 वे भाषण असणार आहे. 2014 मध्ये त्यांनी पहिल्यांदा लाल किल्ल्यावरून भाषण केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, आवश्यक औषधांच्या यादीत म्हणजेच NELM मध्ये मोठ्या प्रमाणात बदल होऊ शकतो. यादीत आतापर्यंत 355 औषधांचा समावेश आहे. तसेच, सरकार कंपन्यांच्या मार्जिनवर CAP लावू शकते. अशा परिस्थितीत औषधांच्या किंमती 70 टक्क्यांपर्यंत कमी केल्या जातील. सरकार याची अनेक टप्प्यांत अंमलबजावणी करू शकते.

याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मेडिकल टुरिझम वाढवण्यासाठी नव्या योजनेची घोषणा करू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात,  देशातील मेडिकल टुरिझमला चालना देण्यासाठी आणि भारताच्या आयुर्वेदिक आणि पारंपारिक औषध पद्धतीला अर्थव्यवस्थेच्या विकासाचा एक महत्त्वाचा मुद्दा समजून काही नवीन घोषणा करू शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे Heal in India, Heal By India या थीमवर असू शकते, ज्यामध्ये सर्वांगीण आर्थिक विकासासाठी एक फ्रेमवर्क तयार केले जाईल.

सरकारी योजनेनुसार...
- आरोग्य अभियानाच्या सर्व योजना एकाच छत्राखाली आणल्या जाऊ शकतात.
- एकूणच आरोग्य योजनेत जुन्या योजनांचा समावेश केला जाईल.

5G चा पहिला कॉल देखील करू शकतात
याचबरोबर, पंतप्रधान नरेंद्र मोदी अन्नधान्य, तेलबिया यासह कृषी क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी रोडमॅप जारी करू शकतात. राज्यांना त्यांची आयात कमी करण्यासाठी उत्पादन वाढवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी करू शकतात. यासाठी स्वतंत्र अर्थसंकल्पात तरतूद असण्याची शक्यता आहे. या योजनेला नवीन नावही दिले जाऊ शकते. तसेच, डिजिटल इंडियाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कनेक्टिव्हिटी आणि 5G तंत्रज्ञानाच्या विकासावरही पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात बोलतील. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून 5G चा पहिला कॉल देखील करू शकतात.

Web Title: pm modi likely to shed more focus on health in this year independence day speech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.