पी. चिदंबरम यांचीही चौकशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 06:02 AM2018-03-02T06:02:45+5:302018-03-02T06:02:45+5:30

एअरसेल-मॅक्सिकनप्रकरणी कार्ती चिदंबरम यांना अटक झाल्यावर आता केंद्रीय गुप्तचर खाते माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची चौकशी करण्याच्या विचारात आहे.

P. Chidambaram also questioned? | पी. चिदंबरम यांचीही चौकशी?

पी. चिदंबरम यांचीही चौकशी?

Next

- संतोष ठाकूर
नवी दिल्ली : एअरसेल-मॅक्सिकनप्रकरणी कार्ती चिदंबरम यांना अटक झाल्यावर आता केंद्रीय गुप्तचर खाते माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची चौकशी करण्याच्या विचारात आहे. त्यांना सीबीआय मुख्यालयात चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता कमी आहे. त्यांचे राजकारणातील स्थान पाहता सीबीआय त्यांच्या घरी जाऊन चौकशी करू शकते. यासाठी सीबीआयने कार्ती चिदंबरम, इंद्राणी मुखर्जी यांना विचारलेल्या प्रश्नांना मिळालेल्या उत्तरांच्या आधारावर प्रश्नावली तयार केली जाणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप गडद होऊ नये, अशी सीबीआयची इच्छा आहे. याच कारणामुळे पी. चिदंबरम यांना सीबीआय आपल्या मुख्यालयात बोलावून आपल्या समोर काही अडचणी निर्माण होऊ नयेत या प्रयत्नात आहे. याचबरोबर सीबीआय चिदंबरम यांच्या विरोधात, असे ठाम पुरावे गोळा करू इच्छिते, की त्याद्वारे न्यायालयात ते दोषी सिद्ध व्हावेत. याच कारणामुळे सर्व पावले मोजूनमापून टाकली जात आहेत.

Web Title: P. Chidambaram also questioned?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.